Home देश भारत-पाक शांततापूर्ण चर्चेशिवाय पर्याय नाही

भारत-पाक शांततापूर्ण चर्चेशिवाय पर्याय नाही

1

भारत-पाकिस्तान या दोन उभय देशांतील प्रश्न लष्करी कारवायांमधून नाहीतर शांततापूर्ण चर्चेतून सोडवणे हा एकमेव मार्ग असल्याचे मत काँग्रेस नेते कॅप्टन अमिरदर सिंग यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली- भारत-पाकिस्तान या दोन उभय देशांतील प्रश्न लष्करी कारवायांमधून नाहीतर शांततापूर्ण चर्चेतून सोडवणे हा एकमेव मार्ग असल्याचे मत काँग्रेस नेते कॅप्टन अमिरदर सिंग यांनी व्यक्त केले आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान परराष्ट्र सचिव पातळीवरची चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे. या संदर्भात सिंग यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, पठाणकोटच्या हल्ला दुखद आहे. पण रक्तपात थांबवायचा असेल तर केवळ शांततापूर्ण चर्चा हा एकच मार्ग आहे. ज्या एक टक्के लोकांना वाटते की शांततापूर्ण चच्रेने हा प्रश्न सुटणार नाही तेच लोक अशा पठाणकोटसारख्या कारवाया करत आहेत. त्यामुळे चर्चा व्हायला हव्यात. आमचे जवान व अधिकारी आम्हाला अशाप्रकारे गमवायचे नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

पठाणकोट हल्लाप्रकरणी सलविंदर सिंगची सत्यशोधक यंत्राद्वारे चाचणी होणार

पठाणकोट हल्ल्याशी संबंध असलेला पंजाब पोलिसचा वरिष्ठ अधिकारी सलिवंदर सिंग याची सत्यशोधक यंत्राद्वारे (लाय डिटेक्टर) चाचणी होणार आहे. त्याने मान्यता दिली तर पुढील आठवडय़ात ही चाचणी होईल. राष्ट्रीय तपास संस्था सध्या त्याची चौकशी करत आहे. सध्या सलविंदर ७५व्या तुकडीचा सहाय्यक कमांडंट असून शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी त्याची चौकशी करण्यात आली.

अजहर मसूदची कोठडीत चौकशी नाही?

पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या अजहर मसूद याला संरक्षणात्मक कोठडीत ठेवण्यात आल्याचे पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे कायदामंत्री राणा सनौल्लाह खान यांनी शुक्रवारी सांगितले. मसूदला अटक केल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे का, याविषयी पाकिस्तान परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांना माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानचे खरा चेहरा यामुळे उघड होत आहे.

यावर पंजाबच्या कायदामंत्र्यांनी त्याला संरक्षणात्मक कोठडीत ठेवल्याचे सांगतिले. त्यामुळे पाकिस्तान किती खरा, खोटा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जैश-ए-मोहंमदच्या कोणत्याही कार्यालयांवर छापे घालण्यात आलेले नाहीत, असे सनौल्लाह यांनी स्पष्ट केले. कारवाईबाबत पाकिस्तान फक्त कांगावा करत आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर बोलताना अजहर मसूदला ‘संरक्षणात्मक कोठडी’त ठेवण्यात आल्याचे सनौल्लाह यांनी म्हटले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version