भुजंगासन

1

भुजंग म्हणजे साप. संस्कृतमध्ये सापाला भुजंग असं म्हणतात. या आसनात आपण शरीराचा वरील भाग हाताच्या साहाय्याने उचलतो. उचललेला शरीराचा वरील भाग हा सापाच्या उगारलेल्या फण्यासारखा दिसतो. म्हणून या आसनाला भुजंगासन किंवा सर्पासन असं म्हणतात.

आसन करण्याची पद्धती
योगामॅटवर पोटावर म्हणजे पालथं झोपावं. पूर्ण शरीर एका रेषेत असावं. दोन्ही पाय सरळ आणि ताठ असावेत. दोन्ही पायांचा एकमेकांना स्पर्श केलेला असावा. आता दोन्ही हात छातीच्या जवळ ठेवावेत. कपाळ जमिनीला लावावं. पूर्ण शरीर सैल ठेवावं. आता हळुवारपणे शरीराचा वरील भाग म्हणजे बेंबीपर्यंतचा भाग वर उचलावा. तसंच मागे बघावं. दोन्ही हात कोपरातून थोडे वाकवावेत. बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे हे आसन करावं.

श्वास

» शरीराचा वरील भाग उचलताना श्वास घ्यावा.

» आसन स्थितीत नियमित श्वासोच्छ्वास असावा.

» शरीराचा वरील भाग खाली आणताना श्वास सोडावा.

वेळ

सुरुवातीला हे आसन चार वेळा करावे, नंतर हळुवारपणे फायनल स्थितीत वेळ वाढवावी.

आसन करतानाची काळजी

भुजंगासन या आसनात आपण शरीराचा वरील भाग वर उचलतो. सुरुवातीला जेवढा वर आणता येईल तेवढाच वर आणावा. या आसनात मान मागे वळवली जाते. जितकी तुम्हाला मान मागे वळवता येईल तितकीच वळवावी. जास्त वळवू नये. त्याचप्रमाणे दोन्ही हात कोपरातून दुमडावेत. हातांना सरळ अथवा ताठ ठेवू नये. हे आसन करताना ज्यांच्या पाठीवर ताण येतो. त्यांनी हे आसन करूच नये. आसन सोडताना घाई करू नये. शरीराचा वरील भाग हळुवारपणे खाली आणावा.

विशेष नोंद

ज्या व्यक्तींना पेप्टिक अल्सर, हर्निया, हायपर थायरॉईड असे आजार आहेत, त्यांनी हे जाणकारांच्या उपस्थितीतच करावं.
शुक्रासन हे सूर्यनमस्काराची सातवी स्थिती आहे.

फायदे

» दीर्घ श्वास सुधारतो.

» या आसनामुळे पाठीचं दुखणं किंवा पाठीशी संबंधित इतर त्रास कमी होण्यास मदत होते.

» मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात.

» या आसनात पोटाच्या स्नायूंवर भरपूर दाब पडतो. त्यामुळे अपचन आणि मलावरोध नाहीसे होतात.

» पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

»लिव्हर व किडनीसाठी हे आसन खूप फायदेशीर आहे.

» या आसनाच्या नित्य सरावाने छाती, खांदे मान आणि मस्तिष्काचा भाग सुदृढ आणि मजबूत होतो, तसेच शरीराचा बांधा सुडौल होतो.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version