Home देश मध्यान्ह भोजनावर शिक्षकांचा बहिष्कार

मध्यान्ह भोजनावर शिक्षकांचा बहिष्कार

1
संग्रहित छायाचित्र

बिहारमधील तीन लाख शिक्षकांनी मध्यान्ह भोजन योजनेवर बहिष्कार घातला आहे.. 

पाटणा – बिहारमधील तीन लाख शिक्षकांनी मध्यान्ह भोजन योजनेवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी बिहारमधील लाखो शालेय विद्यार्थ्यांना उपाशी रहावे लागले.

मध्यान्ह भोजन योजनेवर बहिष्कार घालू नका या राज्य सरकारने केलेल्या आव्हानाकडे दुर्लक्ष करत शिक्षकांनी गुरुवार दुपारपासून बहिष्कार आंदोलन सुरु केले. गेल्या आठवडयात सारन जिल्ह्यातील सरकारी शाळेत २३ विद्यार्थ्यांचा दूषित मध्यान्ह भोजन जेवल्यानंतर मृत्यू झाला होता.

हे सर्व प्रकरण शाळेच्या मुख्याध्यापिक आणि शिक्षकांवर शेकले होते. त्यामुळे बिहारमधील सरकारी शाळेतील शिक्षकांनी या योजनेला विरोध केला आहे. शिक्षक ही योजना सुरु ठेवण्यासाठी सरकाराल सहकार्य करण्यास तयार नाहीत.


शिकवणे शिक्षकांचे काम – अलाहाबाद उच्च न्यायालय 

बिहार मध्यान्ह भोजन दुर्घटनेनंतर उत्तरप्रदेश सरकारने मध्यान्ह भोजन शाळेतील शिक्षकांच्या देखरेखीखाली तयार झाले पाहिजे, असा आदेश दिला होता. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने सरकारचा हा आदेश रद्द केला. विद्यार्थ्यांना शिकवणे हे शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे काम आहे. अन्न शिजवण्यावर लक्ष ठेवणे हे शिक्षकांचे काम नाही असे न्यायालयाने जनहित याचिकेवर सुनावणी करताना स्पष्ट केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version