Home मनोरंजन मनवाला कोणी ओळखत नाही तेव्हा..!

मनवाला कोणी ओळखत नाही तेव्हा..!

1

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या तुलनेत मराठी कलाकारांना प्रेक्षकांचं प्रेम कमीच मिळतं! मुळात हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपट येतात कधी आणि लक्षात राहतात किती? हाही प्रश्न आहेच. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतके कलाकार सोडले तर इतरांना कोणी ओळखत नाही, हेही तितकंच खरं!

आपल्याला लोकांनी ओळखावं यासाठी धडपडणा-या या कलाकारांची सर्वसामान्यांतली ही स्थिती एक वेळ ठिक, पण एखाद्या प्रथितयश चॅनेलमध्येच त्यांना कार्यक्रमासाठी बोलावलं आणि त्यांना तेथील कर्मचा-यांनीच ओळखलं नाही तर त्यांची काय अवस्था होत असेल बरं? तुम्ही म्हणाल, ते चिडतील, चरफडतील..! अगदी खरं.. असंच काहीसं झालं आपल्या मनवा नाईक बरोबर! आता तुम्ही म्हणाल, ही मनवा नाईक कोण? शूऽऽऽऽ. नसेल माहीत तर, आम्ही सांगतो, ‘हो, अलीकडेच तिने ‘पोरबाजार’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. (हा चित्रपटही चालला नाही बरं का?) तीच ती मनवा नाईक! असो. त्याचं झालं असं.. मनवा शुक्रवारी ‘मी मराठी’ म्हणवणा-या एका चॅनेलमध्ये ‘कलाकार, त्यांच्या शिफ्ट आणि त्यातून त्यांच्यावर येणारा अतिताण.’ या विषयावर बोलण्यासाठी आली होती. पण तळमजल्यावरच्या स्वागतकक्षात या मराठी अभिनेत्रीला कोणी ओळखलंच नाही. तेथून तिला थेट पहिल्या मजल्यावर पाठवण्यात आलं. पहिल्या मजल्यावरच्या स्वागत कक्षात बसलेल्या मुलाने तिला बसायला सांगितलं आणि तो आत निघून गेला. त्यानंतर पुन्हा येऊन त्याने मनवाला तिचं नाव विचारलं..त्यामुळे मनवाच्या नाकपुडय़ा चांगल्याच फुगल्या.. इतक्या की, तिचा जलद श्वासोच्छ्वास आजूबाजूच्यांच्या कानावर पडत होता. त्यात भरीस भर म्हणून आणखी एकीने येऊन तू मनवा का? म्हणून विचारलं आणि मनवाच्या रागाचा कडेलोट झाला.. बाई अशा काही फणकारल्या की, त्यांनी भर ऑफिसमध्ये या कर्मचा-यांना झापलं.. ‘तुम्ही मला बोलावणार असाल तर..माझं नाव तुम्हाला माहीत नाही का? असं इतर चॅनेलमध्ये नाही चालत. फक्त तुमच्याकडेच चालतं. तुम्ही माझी दखल घेणार नसाल तर मी ‘निखिल काका’शी बोलू का? म्हणून त्यांना दमही भरला.. सुदैवाने तिला शोधत मेकअपमन तिथवर आली आणि  मनवाने सगळं तिच्या कानावर घातलं.. तसं ती मेकअपमनही तिची माफी मागून तिला घेऊन गेली.. अन्यथा, त्या चॅनलवर त्या दिवशी जणू काही आकाशच कोसळलं असतं.. सांगायचं मुद्दा हा की, त्या बिचा-या कर्मचा-यांचं ठिक हो, पण मनवाने इतकं चिडण्याचं कारण काय? सगळय़ांनीच आपल्याला ओळखावं, असं असलंच पाहिजे का मनवा? बरं मनवाची ओळख ती तरी अशी काय? नसेल एखादा ओळखत तर ओळख करून द्यावी. त्यात बाई ‘अतिताण’ या विषयावर बोलायला आलेल्या, आणि स्वत:च अतितणावाखाली जाऊन बसल्या.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version