Home महामुंबई मनसे फुटीच्या उंबरठ्यावर

मनसे फुटीच्या उंबरठ्यावर

2

माजी आमदार प्रविण दरेकर यांनी मनसे सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून समजते.

मुंबई- विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर मनसेचे अनेक नेते हादरले आहेत. पक्षाची मान्यता आणि निवडणूक चिन्ह अडचणीत सापडणार असल्याने अनेक जण पर्यायाच्या शोधात आहेत. माजी आमदार प्रविण दरेकर यांनी मनसे सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून समजते. येत्या काही दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. दरेकर यांच्या बरोबर मनसेतील असंतुष्टांचा मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे.

मनसेची या निवडणुकीत मोठी धुळदाण उडाली. २०० पेक्षा जास्त उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या १२ आमदारांपैकी एकालाही विधानसभेत जाता आले नाही. जुन्नरमधून एकमेव आमदार  निवडून आला. काही विद्यमान आमदार तिस-या क्रमांकावर फेकले गेले. मुंबईत पक्षाची स्थिती खूप वाईट होती. यामुळे राजकीय भवितव्य अंधारात असल्याने अनेक माजी आमदार, पदाधिकारी मनसे सोडण्याच्या तयारीत आहेत.

प्रवीण दरेकर हे मागठाणे मतदारसंघातून पराभूत झाले. ते तिस-या क्रमांकावर फेकले गेले. या मतदारसंघात भाजप उमेदवार दुस-या क्रमांकावर होता. आमदारांनी काम केले नाही म्हणून पराभव झाला हे बाळा नांदगावकर यांचे वक्तव्य दरेकरांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळेच त्यांनी तातडीने सरचिटणीसपदा राजीनामा दिला.

आता ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यांच्या बरोबर मुंबईतील अनेक पदाधिकारी भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. रायगडमधील मनसेचे पदाधिकारी त्यांच्या संपर्कात असून तेथेही मनसेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. काही पराभूत उमेदवार आणि माजी आमदारांनीही दरेकरांबरोबर संपर्क केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मनसेमध्ये एक मोठी फुट पहायला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

2 COMMENTS

  1. जे आमदार ज्या पक्ष्यात राहून मोठ्या पदावर जातात व जनतेने त्यांना नाकारल्यावर पदाचा राजीनामा देवून दुसर्या पकश्यात जातात अश्या आमदारांना व नेत्यांना पुन्हा परत पक्ष्यात सामावून घेवू नये कारण ते पराभव न स्वीकारता स्वताच्या स्वराथापाई पक्ष्य सोडतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version