Home महामुंबई महागडी औषधे विकताना टाटा रुग्णालयाच्या कर्मचा-यांना अटक

महागडी औषधे विकताना टाटा रुग्णालयाच्या कर्मचा-यांना अटक

1

शस्त्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित औषधे व सामग्री रुग्णांना परत देण्याऐवजी त्याची परस्पर विक्री करणा-या टाटा मेमोरियल रुग्णालयातील दोन कर्मचारी व दोन घाउक विक्रेत्यांना भोईवाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

मुंबई – शस्त्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित औषधे व सामग्री रुग्णांना परत देण्याऐवजी त्याची परस्पर विक्री करणा-या टाटा मेमोरियल रुग्णालयातील दोन कर्मचारी व दोन घाउक विक्रेत्यांना भोईवाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

रुग्णालयाचे कर्मचारी अदित करोटिया व वॉर्ड बॉय दिनेश दोढीया यांच्यासह राजू बागडे व राकेश बाब्रीया अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे कर्मचारी अतिदक्षता विभागातून औषधे चोरत असल्याचे पुढे आले आहे. शस्त्रक्रियेसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना डॉक्टर औषधे बाहेरून आणायला सांगतात.

शस्त्रक्रियेनंतर त्यातील न वापरलेली सामग्री व औषधे रुग्णांच्या नातेवाइकांना परत न करण्याची जबाबदारी कर्मचा-यांची असते. मात्र हे कर्मचारी औषधे विकत होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version