Home टॉप स्टोरी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे निधन

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे निधन

2

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

शिलाँग- भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

शिलाँगमधील आयआयआयएममध्ये जाहीर कार्यक्रमात भाषण करत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.

राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतरही देशभरातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक व हजारो तरुणांना मार्गदर्शन करणा-या कलाम यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

केंद्र सरकारने अब्दुल कलाम यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

आयआयएमच्या विद्यार्थ्यांना सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास व्याख्यान देत असताना ते अचानक कोसळले. त्यांना तातडीने बेथनाय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती मेघालयचे मुख्य सचिव पी. बी. ओ वरजिरी यांनी दिली.

कलाम यांचे पार्थिव मंगळवारी गुवाहाटीवरून दिल्लीला नेण्यात येणार आहे. त्याबाबत केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांच्याशी मेघालयचे मुख्य सचिव पी. बी. ओ वरजिरी यांनी चर्चा केली.

२००२ ते २००७ या काळात कलाम हे राष्ट्रपती होते. नामवंत शास्त्रज्ञ असलेले कलाम हे भारतीय अंतराळ व क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे उद्गाते होते.

2 COMMENTS

  1. भारतरत्न हरपले

    एक अतिशय हुशार मितभाषी वैज्ञानिक. भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालीचे प्रणेते व मार्गदर्शक. स्वतंत्र भारताच्या इतिहासात डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव सदैव आदराने घेतले जाईल.
    देश थोर शास्त्रज्ञाला मुकला.सदैव शिकण्यास आणि शिकवण्यास तयार असलेले डॉ. कलाम यांचा शेवटचा कार्यक्रमही विद्यार्थ्यांसाठीच झाला.भारताचे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे आपल्यात नाहीत कल्पना सहन होत नाही.देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात यांच्या सारखे अथक काम करणारा अवलिया होणे नाही.सर्व राष्ट्रपतींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या डॉ. ए. जी. जे. अब्दुल कलाम यांनी देशातील अनेक तरुण मनांना कायम चेतना देण्याचे काम केले.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके असलेले “कलाम सर‘ आयुष्याच्या अखेरच्या क्षणांपर्यंत त्यांचे आवडते विद्यादानाचे काम करत राहीले.डॉ. अब्दुल कलाम यांचे हुशार आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व मात्र सदैव स्मरणात राहील.सर्वस्वी देशाला वाहून घेतलेले,अत्यंत नम्र आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व. माझे शतशः प्रणाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version