Home महामुंबई माढाची जागा मिळवण्यासाठी युतीत रस्सीखेच

माढाची जागा मिळवण्यासाठी युतीत रस्सीखेच

1

सत्तेसाठी मोट बांधून एकत्र आलेल्या महायुतीमधील तणाव दिवसेंदिवस वाढत असून माढा मतदारसंघ मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष अडून बसल्याने पेच अधिकच वाढला आहे.

मुंबई – सत्तेसाठी मोट बांधून एकत्र आलेल्या महायुतीमधील तणाव दिवसेंदिवस वाढत असून माढा मतदारसंघ मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष अडून बसल्याने पेच अधिकच वाढला आहे.

याबाबत महायुतीच्या रविवारी झालेल्या बैठकीतही कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. दरम्यान, माढा न मिळाल्यास आपल्याला महायुतीसोबत राहण्यात रस नसल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी ठणकावून सांगितले आहे.

शिवसेना-भाजप युतीने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांना सोबत घेण्यात यश मिळवले. मात्र माढा मतदारसंघावर दोघांनीही दावा सांगितला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा सदाभाऊ खोत यांच्यासाठी हवी आहे, तर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर या जागेवर लढण्यास उत्सुक आहेत.

गेल्या निवडणुकीत त्यांनी स्वतंत्रपणे शरद पवार यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवून एक लाख मते मिळवली होती. यावेळी पवार स्वत: मैदानात नसल्याने ही जागा आपण सहज जिंकू, असा विश्वास जानकर यांना वाटत असल्याने ते या जागेसाठी अडून बसले आहेत.

यावर तोडगा काढण्यासाठी रविवारी महायुतीची बैठक झाली. मात्र त्यात तोडगा निघू न शकल्याने २१ फेब्रुवारी रोजी होणा-या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे महायुतीच्या सूत्रांनी सांगितले. मात्र माढा न मिळाल्यास आपल्याला महायुतीसोबत राहण्यात रस नसल्याचे महायदेव जानकर यांनी ठणकावून सांगितल्याने महायुतीतील तणाव वाढला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version