Home देश मानहानी प्रकरणी इराणी यांना न्यायालयाचे समन्स

मानहानी प्रकरणी इराणी यांना न्यायालयाचे समन्स

0

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना शुक्रवारी दिल्ली न्यायालयाने समन्स बजावले आहेत

नवी दिल्ली – केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना शुक्रवारी दिल्ली न्यायालयाने समन्स बजावले आहेत. काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या विरोधात मानहानीकारक विधान केल्याप्रकऱणी न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहेत.

महानगर दंडाधिकारी धीरज मित्तल यांनी इराणी यांच्याविरोधात समन्स बजावले असून २७ सप्टेंबर रोजी त्यांनी न्यायालयात हजर रहावे असे आदेश देण्यात आले आहेत.

गुजरात विधानसभेचे निकाल ज्या दिवशी जाहीर झाले होते म्हणजेच २० डिसेंबर २०१२ रोजी टिव्ही चॅनेलवरील एका कार्यक्रमांतर्गत इराणी यांनी निरुपम यांच्याविरोधात मानहानीकारक विधान केले होते. त्यानंतर निरुपम यांनी याविरोधात तक्रार दाखल केली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version