Home महामुंबई मुंबईतील विसर्जनात चोरांची चांदी

मुंबईतील विसर्जनात चोरांची चांदी

0

विसर्जनादरम्यान गणरायांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आलेल्या भाविकांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लुटले.

मुंबई- विसर्जनादरम्यान गणरायांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आलेल्या भाविकांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लुटले. गणेशगल्ली आणि लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत महिलांच्या गळ्यातील दागिने खेचण्याचे प्रकार घडले. तर काहींचे मोबाईल हिसकावून नेले. तर गर्दीचा फायदा घेत काहींचे पाकीट मारल्याच्या घटना घडल्या.

गणेशगल्ली आणि लालबागच्या राजाच्या मिरवणुका निघाल्यानंतर गणरायांचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या भाविकांचे खिसेच साफ करण्यात आले. अनेक भाविकांचे पाकीट मारण्यात आले तर अनेक महिलांच्या मंगळसुत्रांसह सोन्याचे दागिनेही लांबविण्याचे प्रकार घडले.

बाप्पांच्या मिरवणुका निघाल्यानंतर घरी परतत असताना भाविकांना आपले दागिने तसेच पाकीट मारल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस स्थानक गाठले आणि याप्रकरणी तक्रार नोंदवल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version