Home टॉप स्टोरी मुंबईत तीन वर्षात १६ हजार झाडांची कत्तल

मुंबईत तीन वर्षात १६ हजार झाडांची कत्तल

1

आरे कॉलनीमधील झाडे मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाच्या प्रस्तावित कारशेडसाठी कापण्यात येणार असल्याने यावरून राजकीय धूळवड खेळली जात असतानाच आता यात राष्ट्रवादी काँग्रेसने उडी मारली आहे.

मुंबई- आरे कॉलनीमधील झाडे मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाच्या प्रस्तावित कारशेडसाठी कापण्यात येणार असल्याने यावरून राजकीय धूळवड खेळली जात असतानाच आता यात राष्ट्रवादी काँग्रेसने उडी मारली आहे.

झाडे कापून विकास प्रकल्प राबवले जात असतील तर असे प्रकल्प नकोच, अशी भूमिका आरेच्या प्रकरणात शिवसेनेने घेतली.

या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिका गटनेते धनंजय (दादा) पिसाळ यांनी घेतला आहे. गेल्या तीन वर्षात विविध विकास प्रकल्पांसाठी तब्बल १६ हजारांहून अधिक झाडांची कत्तल झाली. ही झाडे तोडताना शिवसेनेचे युवराज कुठे होते.

पुनर्रोपणाच्या नावाखालीच ११ हजार झाडांची कत्तल करण्यात आली. याला जबाबदार कोण? मारेक-यांवर सत्ताधारी शिवसेना कारवाई करणार का, असा खडा सवाल पिसाळ यांनी केला.

मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांसह विविध नागरी पायाभूत प्रकल्प, सुविधा प्रकल्पांच्या कामांसाठी झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणामार्फत परवानगी दिली जाते. तीन वर्षात विकास प्रकल्पांच्या ठिकाणी ३३ हजार २०९ झाडांपैकी ५ हजार ३३९ झाडे कापली गेली. तर ११ हजार ४७१ झाडांच्या पुनर्रोपण करण्यास परवानगी दिली होती.

परंतु पुनरेपण करण्यात येणा-या झाडांचे आयुष्य कमी असते. त्यामुळे कापण्यात आलेली पाच हजार झाडे आणि पुनरेपित करण्यात आलेली ११ हजार झाडे अशाप्रकारे सुमारे १६ हजारांहून अधिक झाडे ही नष्ट झाली आहेत.

पुनरेपित करण्यात आलेली झाडे जर कुठे पुनरेपित केली असतील याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिका गटनेते धनंजय पिसाळ यांनी केली आहे. आरे कॉलनीतील झाडांची कत्तल करण्यास आपला विरोध आहे.

ते शहरातील एकमेव नैसर्गिक वन असून ती आपल्यासाठी देणगी आहे. तेथील झाडे कापली जाऊ नयेत या मताचे आपण आहोत. परंतु विकास प्रकल्पासाठी झाडांची कत्तल नको, असे जर शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सांगत असतील तर तीन वर्षात १६ हजार झाडांची कत्तल कोणासाठी केली, असा सवाल त्यांनी केला आहे.

ही झाडे कोणाच्या फायद्यासाठी कापली गेलीत. ही झाडे कापण्यास आणणाऱ्या संबंधित अधिका-यांची चौकशी प्रशासन आणि शिवसेना करणार आहे का, असाही सवाल त्यांनी केला. झाडे कापण्याचे प्रमाण अधिक दिसू नये म्हणून पुनरेपित दाखवले जाते. परंतु पुनरेपित झाडे ही कधीच जगली जात नाहीत.

त्यामुळे यामध्ये विकासक आणि अधिकारी यांचेही साठेलोठे असल्याचा आरोप पिसाळ यांनी केला आहे. याबाबत आपण महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना निवेदन देऊन पुनरेपित करण्यात आलेल्या झाडांची माहिती आपल्याला मिळावी, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

1 COMMENT

  1. झाडे कापून विकास प्रकल्प राबवले जात असतील तर असे प्रकल्प नकोच, हि शिवसेनेने घेतलेली भूमिका आरेच्या प्रकरणात अत्यंत योग्य आहे. वर्सोवा ते घाटकोपर येथील मेट्रो प्रकल्प किमान ६ ते ७ वर्षाआधी राबवण्यात आला, त्यात जे बी नगर येथील ठिकाण बघितले तर अत्यंत घाणेरडे प्रकारे तेथील मेट्रोची बांधणी करण्यात आलेली आहे. एका बाजूस आयसीआयसीआय बँकेची इमारत तर दुसऱ्या बाजूस कोहिनूर हॉटेल, जर विचार करा गर्मिच्या दिवसात सामान्य आणि गरीब जनता बसमधून जाते, त्यात भरमसाट गर्दी आणि जे बी नगर ह्या ठिकाणी असणारे रहदारी जाम,एखादा व्यक्ती जीव गुदमरून मरून जाईल, कारण दोन्ही कोने इमारतीने आणि वरील जागा मेट्रोच्या रहदारी करिता अशाने नैसर्गिक हवा कशी येणार? “झाडे लावा आणि झाडे वाचवा”हा निसर्ग मंत्र सरकार वेळोवेळी देत आली आहे. कारण झाडांमुळे पर्यावरण सुशोभित राहते, हवेत कोणताही आरोग्य हानिकारक वायू पसरला जात नाही. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हस्तक्षेप घेतेसच का? आधीच वर्सोवा ते घाटकोपर या मेट्रो प्रकल्पात सामान्य नागरिकांचे पावसाळी दिवसात भरपूर हाल झाले, त्यातच चकाला येथील पेट्रोल पंप जवळील हायवे करीताचा जो जोड रस्ता होता तो बिस्लेरी कंपनीकडून वळसा घालून जोडला जात आहे. आजूनही त्या मार्गावरून ज्या बसेस सरळ हायवे करिता जोडण्यात येतात, त्यानाही मुबा देण्यात येत नाही उलट त्या बसेस करिता फक्त एक पदरी जागा हायवेला जाण्याकरिता ठेवण्यात आला आहे, जी बस २ मिनिटात हायवेला जोडण्यात येऊ शकते त्याच बसला हायवेपर्यंत येण्यास किमान अर्धा ते पाऊण तास लागतो. तो रस्ता कायम बंद ठवावा असे का मेट्रो प्रकल्पाच्या टेंडरमध्ये लिहिले होते का? रहदारी जाम मुळे बसेस करिता डिजेल भरपूर प्रमाणात वाया जाते आणि याचा सर्व भार तिकीट दर वाढ करून तो भार सामान्य जनतेस दिला जातो. पगार तुट पुंजा त्यामुळे सामान्य जनता बसेस चा वापर करतात. त्यातच अशी अडवणूक यामुळे सामान्य जनता पिसाळणार नाही तर का सरकारचा उधोउधो करणार? मेट्रो ३ बद्दल झाडतोड करू नये हा शिवसेनेचा निर्णय अत्यंत योग्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version