Home महामुंबई मुंबई-पणजी व्होल्वो सेवेला थंड प्रतिसाद

मुंबई-पणजी व्होल्वो सेवेला थंड प्रतिसाद

1

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमिवर मुंबई ते पणजी व्होल्वो सेवा राज्य परिवहन महामंडळाने सुरू केली. मात्र या सेवेला सुरुवातीच्या दिवसात अगदीच थंड प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई – उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमिवर मुंबई ते पणजी व्होल्वो सेवा राज्य परिवहन महामंडळाने सुरू केली. मात्र या सेवेला सुरुवातीच्या दिवसात अगदीच थंड प्रतिसाद मिळाला आहे.

जेमतेम १० ते २० टक्केच लोकांनी या गाडीतून प्रवास करणे पसंत केले आहे. त्यामुळे ही गाडी मुंबई ते पणजी मोकळीच ये-जा करत तोटयात चालवण्याची वेळी महामंडळावर आली आहे. तरीही येणा-या काही दिवसात या गाडीला चांगला प्रतिसाद मिळेल, असे एसटीतील एका वरीष्ठ अधिका-यांने सांगितले.

मुंबईहून पणजीसाठी १५ एप्रिलपासून व्होल्वो बस सेवा सुरू करण्यात आली. त्यासाठी १२४२ रुपये तिकीट आकारण्यात आले. पूर्ण वातानुकूलीत असलेल्या या गाडीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा महामंडळाला होती. मात्र गाडी सुरू झाली त्याच्या पहिल्याच दिवशी एका फेरीचे केवळ ७३९८ रूपयेच एसटीच्या पदरात पडले. त्यावरून या गाडीला मिळालेला सुरूवातीचा प्रतिसाद लक्षात येईल.

 एका फेरीमागे कमीत कमी ३९,००० रूपये उत्पन्न मिळावे, अशी एसटीची अपेक्षा आहे. गाडी पूर्ण भरून गेल्यास १ लाख ३ हजार रूपये येवढे उत्पन्न मिळू शकते. मात्र सध्या तरी तशी स्थिती नाही, अशी एसटीतील वरिष्ठ सुत्रांनी दिली. दरम्यान सध्याही मुंबई-पणजी या गाडीला जेमतेम १० ते २० टक्केच प्रवासी मिळत आहे. दरम्यान गाडी सुरू करताना असलेले ढिसाळ नियोजन, प्रसिद्धीमध्ये झालेली कुचराई आणि खाजगी गाडयांच्या तुलनेत अधिक तिकीट दर यामुळेच ही गाडी तोटय़ात चालत असल्याचा आरोप कामगार नेत्यांकडून केला जात आहे.

1 COMMENT

  1. ह्या गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण , संगमेश्वर , रत्नागिरी , लांजा , राजापूर इथे थांबच नाही.
    या स्थानकांवर या गाडीला थांबा द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version