Home मनोरंजन मुलगी शिकली प्रगती झाली

मुलगी शिकली प्रगती झाली

1

मुलगी शिकली प्रगती झाली. हो मुलीच्या किंवा मुलांच्या शिकण्याने नक्कीच प्रगती होते. त्यात कुटुंबाची, राज्याची तसेच देशाचीही प्रगती होते.

मुलगी शिकली प्रगती झाली. हो मुलीच्या किंवा मुलांच्या शिकण्याने नक्कीच प्रगती होते. त्यात कुटुंबाची, राज्याची तसेच देशाचीही प्रगती होते. सध्या शिक्षणाचे महत्त्व एवढे वाढले की शिक्षणाशिवाय पर्याय उरला नाही.

मुलगी किंवा मुलगा शिकले तर तो कुठे तरी नोकरी करून कुटुंबाचा भार उचलू शकतो. हे झाले शहरात पण भारतात अशी काही राज्ये आहेत की अजूनही स्त्रियांना शाळेत शिक्षण घेता येत नाही.

एकतर गरिबी किंवा समाजाची रूढी-परंपरा यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. लहान वयातच त्यांना लग्नाच्या बंधनात अडकून परक्याच्या घरी जावे लागते. पण हे सगळे टाळता येऊ शकते. ते पण तुम्ही स्वत: शिक्षित असाल तर. सध्या देशात सरकारने  प्रत्येक जण शिक्षित होण्यासाठी मोहीम उघडली आहे. याचा प्रचार जाहिराती, काही रोड शोज यामार्फत केला जातो.

पण निर्माता विजय शेट्टी यांनी राधाकृष्ण टेलिफिल्मच्या बॅनरखाली प्रगती ही हिंदी मालिका डी. डी. नॅशनलवर दुपारी २ वा. प्रसारित होत आहे. विजय सनी ही मालिका दिग्दर्शित करीत आहेत. मूळ संकल्पना निर्माते विजय शेट्टी यांची असून लेखन झेबान तसदिक अलिखान यांनी केले आहे.

प्रगती ह्या मालिकेची कथा एका लहान मुलीभोवती फिरते. शिकण्याची आवड आहे पण घरातील व समाजातील अशिक्षित, जुन्या विचारांची, जुन्या रूढी परंपरेला धरून बसलेले लोक व समाजामुळे या प्रगतीला व इतर मुलींना शाळेत जाता येत नाही.

सध्याचा ज्वलंत विषय घेऊन विजयजींनी या मालिकेची निर्मिती केली आहे. सिनेसृष्टीत गेली पंचवीस वष्रे साऊंड रेकॉíडंग म्हणून काम करीत असलेल्या विजयजींनी सध्याच्या कौटुंबिक, विनोदी, रहस्यमय व रिअ‍ॅलिटी शोच्या भाऊगर्दीत चांगलाच टीआरपी आहे.

मालिकेचे दिग्दर्शक विजय सनी यांनी करम अपना अपना, कयामत, कश्मकश, कहानी घर घर की, सिंहासन बत्तीशी, बडे अच्छे लगते है आदी ब-याच मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. ब-याच कौटुंबिक मालिका केल्या आहेत पण समाजप्रबोधन करणारी एखादी मालिका करायची इच्छा होती ती विजयजींमुळे पूर्ण झाली. संगीत: प्रकाश नर, शीर्षक गीत मनोजसिंग, कॅमेरामन अमित पोडिया, कला दिग्दर्शक संजय जाधव आणि प्रोजेक्ट हेड म्हणून राजीव रंजनसिंग काम पाहत आहेत.

प्रगती या मालिकेत प्रगती या मुलीची भूमिका प्रग्या शर्मा हिने केली असून गजेंद्र चौहान, रेणू पांडे, मीनाक्षी वर्मा, निमय बाली, अक्षय वर्मा, िपकी सिंग, अमिता सनी, धमेंद्र जयस्वाल, महेश भंडारी, गुंज, जय सिंग, शोएब व बालकलाकार रिझवान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. जयपूर, राजस्थानमधील दुलारावजी गांव तसेच मुंबईत फिचर स्टुडिओ, मढ आयलंड येथे सुरू आहे.

1 COMMENT

  1. मुलगी शिकली प्रगती झाली!
    मुलगा फक्त शीकला, प्रगत नाही झाला.
    मग मुलीच्या शीकन्याचा काय उपयोग झाला?
    मुलीचा प्रगतीला अडथळा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version