Home महामुंबई मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली

मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली

1

मुस्लिम असल्याने एका पदवीधर तरूणाला मुंबईतल्या एका कंपनीने नोकरी देण्यास नकार दिला आहे.

मुंबई- मुस्लिम असल्याने एका पदवीधर तरूणाला मुंबईतल्या एका कंपनीने नोकरी देण्यास नकार दिला आहे. झिशान अली खान असे या तरूणाचे नाव असून त्याने एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

झिशानने आपल्या दोन मित्रांसह ‘हरे कृष्णा एक्स्पोर्ट्स प्रा. लिमिटेड’ या हि-यांची निर्यात करणा-या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र ‘आम्ही फक्त बिगर-मुस्लिम उमेदवारांनाच नोकरी देतो’ असा मेल पाठवत या कंपनीने त्याला नोकरी देण्यास नकार दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कंपनीविरूद्ध धार्मिकतेचा आरोप ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणात दोषी आढळल्यास संबंधितांस तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, आम्ही याप्रकरणी अद्याप तपास करत आहोत, असे पोलीस निरीक्षक सुर्यकांत जगदाळे यांनी सांगितले.

झिशानने या मेलची कॉपी सोशल मिडियात पोस्ट केली व आपल्यावर धार्मिक भेदभाव होत असल्याचे मत मांडले. यानंतर फेसबुक आणि सोशल मिडियात जोरदार चर्चा झाली.

दरम्यान, कंपनीने हा प्रकार चुकून झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. हरेकृष्ण कंपनीचे एचआर हेड महेंद्र देशमुख यांनी आमच्या कंपनीत कोणताही जातीय अथवा धार्मिक भेदभाव होत नसल्याचे म्हटले आहे. झिशानला गेलेला मेल कंपनीत नव्याने आलेल्या व प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत असलेल्या कर्मचा-याकडून गेल्याचे सांगितले. तसेच या घटनेबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो, असेही कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, अल्पसंख्याक मंत्री एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. लिंग, धर्म, जातीच्या आधारावर नोकरी नाकारणे चुकीचे आहे. अशा घटना घडत असतील तर राज्य सरकार याचा गांभीर्याने विचार करेल अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.

1 COMMENT

  1. बरेचदा मुसलमान उमेदवार नोकरीत उत्तम व प्रामाणिकपणे काम करतात, पण नोकरीवर असतानाही नमाज पढण्यास जाऊ द्यावे अन्यथा आम्ही दिवसात ५ वेळा नमाज अदा केले नाही तर मुसलमान राहणार नाही व आम्ही नापाक होऊ असे दावे करू लागतात आणि खाजगी क्षेत्रात असले लाड खपवून घेता येत नाहीत.
    प्रामुख्याने ह्या कारणासाठी त्यांना उमेदवार म्हणून पसंती दिली जात नाही. मुसलमान उमेदवार बांगलादेशी घुसखोर निघाला तर काय करा ? अशी भिती देखील नोकरी देणार्‍यांना वाटते.
    >
    मी तर असे ऐकले आहे की आघाडी सरकारच्या काळापासून अगदी मंत्रालयातही नमाज अदा करण्यास मुसलमानांना वेगळी जागा दिलेेली आहे.** माहितगारांनी ह्याची पुष्टी करावी***
    >
    सारे मुसलमान अतिरेकी नाहीत… पण “सारे मुसलमान अतिरेकी आहेत “असं कोणी समजत असल्यास तो मूर्ख व धर्मांध आहे असं म्हणावं लागेल. पण मुस्लिमांनी त्यांची प्रतिमा अधिक सुधारली तर “मुसलमान उमेदवार असल्यास नोकरीसाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल” असेही दिवस भविष्यात येऊ शकतात. सच्चा मुसलमान माणूस काम-धंदा करत असेल तर तो सहसा कामात लबाडी करताना मला तरी दिसलेला नाही. पण हिंदू धंदेवाईक लोक मात्र अनेकदा हिंदूंनाच फसवताना दिसतात ह्याचेच जास्त वाईट वाटते.
    >
    रायगड मधे माझे काही मुसलमान मित्र आहेत, ज्यांनी २००६-०७ साली मुसलमान व हिंदू अशा दोन्ही धर्माच्या वाळू माफियांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केल्या होत्या. त्यांनी त्या जनहित याचिका मागे घ्याव्या म्हणून धंद्यात कमीशन ५ % व २ कोटी रुपये रोख इतकी मोठी लालूचही त्यांना वाळू माफियांनी दाखवली होती पण ते त्याला भुलले नाहीत. आपल्यातले किती जण २ कोटी रुपायासाठी साठी इमान विकायला तयार झाले असते ? हा प्रश्न मला पडतो आहे.
    >
    जनहिताचे काम असल्याने मी माझ्या मुस्लिम मित्रांकडे पैशाची मागणी केलेली नव्हती व तशी अपेक्षाही मला नव्हती. तरी देखील माझा संगणक वापरला व मी अन्य मदत केली म्हणून त्यांनी मला जबरदस्ती मानधन दिलेच. मुंबईतून रायगडला येण्या-जाण्यासाठी वातानुकुलीत गाडीची सोयही करून दिली. शेवटी निरोप देताना माझ्या मुस्लिम मित्रांनी घरच्या बागेतले ५ डझन हापूस आंबे (मी खात नाही हे माहीत असूनही) जबरदस्ती गाडीत चढवून दिले.
    >
    डीझेल चोरीच्या धंद्याआड १९९३ च्या बॉम्ब स्फोट साखळी सारखे आरडीएक्स रायगडमधे पुन्हा कधीही उतरवले जाऊ शकते पण सरकारचेच त्याकडे लक्ष नाही अशी सावधगिरीची माहिती देखील मला त्यांनी त्यावेळी दिली होती.
    >
    त्या वेळी धार्मिक मुद्दे बाजूला ठेऊन आम्ही एकत्र येऊन उत्तम प्रकारे काम केले व त्यात आम्हाला चांगले यश मिळाले. कदाचित मला आवडणार नाही म्ह्णून हॉटेलमधे जेवताना माझे मुस्लिम मित्र शाकाहारी जेवणच मागवत. आमचे काम सुरु असताना रमझानचा महिना सुरु होता. तेव्हा माझ्या घरी आलेल्या मुस्लिम मित्राने माझ्या उपनगरात असलेली मशीद शोधून तिथे जाऊन नमाज पढला. माझ्या घरी त्याने नमाज पढणे मला कदाचित आवडणार नाही असे त्याला वाटले असावे. नंतर एकत्रितपणे रात्रभर खादाडीचा (सहरी) कार्यक्रमही आम्ही केला. ते मुसलमान व मी हिंदू असूनही मला ज्यांचा खूपदा अभिमान वाट्ला असेच ते मित्र आहेत आणि माझ्या माहिती नुसार हे देखील विशेष की त्यांनी एकच लग्न केले आहे.
    ** मात्र राम मंदीर, समान नागरी कायदा, गायींच्या कत्तली इत्यादी बाबत आजही कदाचित मी व माझ्या मुसलमान मित्रांचे एकमत होणे कठीण आहे.**
    पण काही मतभेद असूनही आम्ही एकत्र येऊन चांगले काम करू शकतो हे देखील सत्य आहे.
    ———————————————————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version