Home महाराष्ट्र मेघे यांचा काँग्रेसला रामराम, भाजपशी सलगी

मेघे यांचा काँग्रेसला रामराम, भाजपशी सलगी

0

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पत्र लिहून काँग्रेसमधील सर्व पदांचा व सदस्त्वाचा राजीनामा दिला.

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पत्र लिहून काँग्रेसमधील सर्व पदांचा व सदस्त्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसला रामराम करुन मेघे पिता-पुत्र यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे.

काँग्रेस पक्षात नाराज असलेल्या मेघे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील राजकारणात डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेघे यांना सबूरीने घेण्यास सांगण्यात आले. मात्र मेघे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पत्र लिहून काँग्रेसमधील सर्व पदांचा व सदस्त्वाचा राजीनामा दिला आहे.

दत्ता मेघे यांचा पुत्र सागर याने लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्याचा पराभव झाला. सध्या राज्यात भाजपचे वारे वाहत आहेत. तसेच मेघे आणि गडकरी यांच्यात अनेक वर्षापासून मैत्री आहे. नुकतीच त्यांची एक गुप्त बैठक झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर दत्ता मेघे यांच्या भाजप प्रवेशाची आता फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version