Home टॉप स्टोरी मोदींचा लोकप्रियतेचा फुगा फुटला

मोदींचा लोकप्रियतेचा फुगा फुटला

2

फॉर्च्युन मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील महान नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेखही नसून या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ४२ व्या स्थानावर आहेत.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फुगा भारतात फुटला आहेच, परंतु त्यांच्या लोकप्रियतेचा डंका जगभरात पिटणा-यांनाही धक्कादायक बातमी आहे. जगातील महान नेत्यांची यादी फॉर्च्युन मासिकाने प्रसिद्ध केली असून त्यात नरेंद्र मोदी यांचा समावेश नाही. त्याऐवजी दिल्लीत भाजपासारख्या बलाढय़ पक्षाला एकटय़ाच्या जिवावर धूळ चारणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या यादीत स्थान मिळाले आहे.

मोदी यांच्याबरोबर अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांचेही नाव यादीत नाही. विशेष म्हणजे गेल्या वर्षी मोदी यांचे यादीत पाचवे स्थान होते.

जागतिक स्तरावरील प्रसिद्ध मासिक फॉर्च्युन दरवर्षी जगभरातील महान नेत्यांची यादी प्रसिद्ध करते. त्यात मोदी यांचा समावेश नसल्याने मोदी यांच्या आंधळ्या भक्तांची निराशा होणे स्वाभाविकच आहे.

भारतातून केवळ केजरीवाल यांचेच नाव यादीत आहे. महान नेत्यांच्या यादीत ते ४२ व्या स्थानावर आहे.

अ‍ॅमेझोनचे संस्थापक जेफ बेझोस हे पहिल्यास्थानी आहेत. पोप फ्रान्सिस, आँग सान स्यू की आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.

केजरीवाल यांचे नाव यादीत समाविष्ट होण्यासाठी त्यांनी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी वापरलेली सम-विषम योजना महत्त्वाची ठरली आहे.

या योजनेमुळे केजरीवाल यांची प्रतिमा उंचावली असून फॉर्च्युन मासिकाने केजरीवाल यांची प्रशंसा केली आहे. राजकीय धोका पत्करून केजरीवाल यांनी ही योजना राबवल्याचे मासिकाने म्हटले आहे.

ओबामा यांना देशातील तसेच बाहेरील आव्हाने पेलण्यात आलेले अपयश त्यांना यादीतून वगळण्यासाठी कारण ठरले आहे.

2 COMMENTS

  1. पैसे वून केजारीचे नाव गेतले असेन .तुम्ही काय सांगता तुम्हीपण त्य्तालेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version