Home टॉप स्टोरी मोदींचे छायाचित्र, गुगलची माफी

मोदींचे छायाचित्र, गुगलची माफी

0

गुगल सर्च इंजिनमध्ये गुन्हेगारांच्या छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरुन गुगलने माफी मागितली आहे.

नवी दिल्ली- गुगल सर्च इंजिनमध्ये गुन्हेगारांच्या छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरुन गुगलने माफी मागितली आहे.

गुगल सर्चमध्ये ‘भारतातील १० गुन्हेगार’ सर्च केल्यास पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे दिसतात. या प्रकरणी गुगलने माफी मागितली आहे. गुन्हेगारांचे छायाचित्र सर्च केल्यावर मोदींचे येणारे छायाचित्र हे गैरसमजूतीने झाल्याचे गुगलने म्हटले आहे.

गुगलवर ‘Top 10 Indian criminals’ असा शोध घेतल्यास पंतप्रधान मोदी यांच्या बरोबर दाऊद इब्राहीम, हाफिज सईद आणि ओसामा बिन लादेनही दिसतो. विशेष म्हणजे यात रविशंकर, ह्रतिक रोशन, सोनाक्षी सिन्हा आणि अरविंद केजरीवालही पाहायला मिळतात. सर्च केल्यावर चेहरे काही प्रमाणात बदलतात मात्र मोदींचा चेहरा हमखास त्यामध्ये दिसतो.

गुगलवरील जे काही छायाचित्रे दिसतात ते एका ब्रिटिश दैनिकाच्या चुकीच्या मेटाडाटामुळे हा प्रकार घडल्याचे गुगलने स्पष्टीकरणात म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version