Home टॉप स्टोरी मोदींचे नक्राश्रू

मोदींचे नक्राश्रू

1

गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंग्यांना रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न न करण्याचा ठपका ज्यांच्यावर ठेवला जातो त्या नरेंद्र मोदींनीच आता या दंग्यांबद्दल आपल्याला तीव्र दु:ख वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

अहमदाबाद – गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंग्यांना रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न न करण्याचा ठपका ज्यांच्यावर ठेवला जातो त्या नरेंद्र मोदींनीच आता या दंग्यांबद्दल आपल्याला तीव्र दु:ख वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

अहमदाबादच्या न्यायालयाने त्यांना या प्रकरणात क्लीन चिट दिल्यानंतर आपल्या डोक्यावरचे ओझे उतरले असून अतिशय शांत वाटत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या दंग्यांचा ठपका आपल्यावर ठेवण्यात आल्यामुळे आपण पूर्णपणे उद्ध्वस्त झालो होतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाबाबत सुमारे एक दशके मौन बाळगणा-या मोदींना दोषमुक्त झाल्यावर अचानक या दंग्यांची भीषणता, त्यातील क्रौर्य, अमानुषता दिसू लागली आहे. मात्र या दंग्यांबद्दल त्यांनी यापूर्वी वा आताही दिलगिरी व्यक्त केलेली नाही किंवा माफी मागितली नाही.

मात्र आता या दंग्यांनी आपण व्यथित झालो होतो. वैफल्य, दु:ख, निराशा, वेदना आणि अगतिकता अशा भावनांचा आपल्या मनात कल्लोळ उडाला होता, असे दावे त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर केल्याने मोदींच्या या उशिराने दु:खी होण्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २००२ मध्ये झालेल्या या दंग्यांमध्ये सुमारे १००० बळी गेले होते. त्यापैकी बहुसंख्य बळी मुस्लिमांचे होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version