Home टॉप स्टोरी मोदींच्या गुजरातमधून मराठी व्यापा-याला हाकलले

मोदींच्या गुजरातमधून मराठी व्यापा-याला हाकलले

1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये सोने-चांदीवर प्रक्रिया करणा-या मराठी व्यापा-याला मारहाण करून तेथून हाकलण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये सोने-चांदीवर प्रक्रिया करणा-या मराठी व्यापा-याला मारहाण करून तेथून हाकलण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

[poll id=”882″]

गुजरातच्या गोध्रामध्ये सोने-चांदीवर प्रक्रिया करणा-या मराठी व्यापा-यांना गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक व्यापा-यांकडून गुजरात सोडण्यासाठी आणि या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी त्रास दिला जात आहे. यातूनच साता-यातील शशिकांत फडतरे या मराठी व्यापा-याला तेथील व्यापार गुंडाळून कुटुंबासह गुजरात सोडावे लागले.

गुजरातमधील गोध्रा येथे महाराष्ट्रातील अनेक व्यापारी सोने-चांदीवर प्रक्रिया करण्याचा व्यापार करतात. एकटय़ा गोध्रामध्ये या मुख्य व्यापा-यांची ही संख्या दहाहून अधिक आहे. साता-यातील फडतरे यांचेही अनेक वर्षापासून येथे दुकान आहे. मात्र आजूबाजूला असणा-या दुकानदारांनी काही क्षुल्लक कारणावरून त्यांना अनेकदा शिवीगाळ आणि मारहाणही केली होती.

गुजरात सोडा, नाही तर तुम्हाला ठार मारू’ अशा धमक्या दिल्या. काही दिवसांपूर्वीच येथील १० ते १५ जणांनी फडतरे यांना पुन्हा मारहाण करत गोध्रा सोडण्यास जबरदस्ती केली. यामुळेच आपल्याला गुजरात सोडावे लागल्याची माहिती फडतरे यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

‘आपण गुजरातमध्ये राहून व्यापार करत असताना कधीही वाईट वागलो नाही. कोणाशीही वाद केला नाही. कारण, माझे घर तेथील व्यापारावर चालत होते. मात्र माझा व्यापार बंद करण्यासाठी ज्या मंडळींनी जबरदस्ती केली, तशीच इतर मंडळी तेथे असलेल्या मराठी व्यापा-यांनाही त्रास देत आहेत. यामुळे माझ्यासह अनेकांचे व्यापार अडचणीत आले आहेत. आम्हाला तिथेच व्यापार करण्यासाठी सुरक्षा द्यावी’, अशी मागणीही फडतरे यांनी यावेळी केली.

1 COMMENT

  1. गुजरातच्या मुख्यमंत्री काहीच् दिवसांपुर्वी, मुंबईतील हीरे व्यापारी व उद्योगपति यांना गुजरात मध्ये येऊन, उद्योग करायचे आमंत्रण दीले होते. हे वातावरण नियंत्रणात ठेवायची जबाबदारी गुजरात सरकारनेच् पार पाढ़ावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version