Home टॉप स्टोरी मोदी-अॅबे भेटीच्यावेळी राष्ट्रध्वजाचा अपमान

मोदी-अॅबे भेटीच्यावेळी राष्ट्रध्वजाचा अपमान

1

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांच्या येथील भेटीच्या वेळी आयोजकांच्या चुकीमुळे भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाला.


क्वालांलपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांच्या येथील भेटीच्या वेळी आयोजकांच्या चुकीमुळे भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाला.

शनिवारी पंतप्रधान मोदी आणि शिंझो अ‍ॅबे हे औपचारिक हस्तांदोलन करण्यासाठी प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या मागे असलेला भारताचा राष्ट्रध्वज उलटा फडकवण्यात आला होता. या राष्ट्रध्वजातील हिरवा रंग वरती आणि भगवा रंग खाली होता. आयोजकांच्या या चुकीवर सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या १३ व्या आसिआन परिषदेच्या बैठकीसाठी मोदी आणि अ‍ॅबे दोघेही मलेशियात आहेत. या परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय चच्रेपूर्वी औपचारिक हस्तांदोलन करण्यासाठी दोन्ही देशांचे नेते माध्यमांसमोर आले त्यावेळी ही गंभीर चूक दिसून आली.

भारतात गुंतवणुकीची उत्तम संधी – नरेंद्र मोदी

आसिआन अर्थव्यवस्थांनी आशियाच्या विकासामध्ये आपले योगदान दिले आहे. आता २१ वे शतक आशियाचे शतक बनवण्याची जबाबदारी भारताची आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

भारत आणि आसिआन देश नसíगक मित्र आहेत. प्राचीन काळापासून आपले संबंध आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मलेशियात क्वालांलपूर येथे आसिआन व्यवसाय आणि गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते.

२१ वे शतक हे आशियाचे आहे हे मी आसिआन देशांच्या कामगिरीच्या आधारावर बोलत आहे. भारताबद्दलची विश्वासाहर्ता वाढली असून, प्रत्येक आíथक निरीक्षणामध्ये भारत प्रगती करताना दिसत असल्याचे मोदी यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आशावाद आणि विश्वास व्यक्त केल्याचे मोदींनी सांगितले. तुम्ही भारतात येऊन बघा. वाऱ्याची दिशा बदलली आहे. त्यासाठी मी इथे तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो आहे, असे मोदी म्हणाले.

भारत-जपानमध्ये सागरी सुरक्षाविषयक चर्चा

पंतप्रधान मोदी व जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांच्यात सागरी सुरक्षा व दक्षिण चीन समुद्रातील वादांवर विस्तृत चर्चा झाली. भारताच्या ‘मेक इन इंडिया’ या प्रकल्पासाठी जपानने गुंतवणूक करावी, अशी मागणी मोदी यांनी केली.

भारत-जपानचे संबंध हे अधिक दृढ होणे गरजेचे आहे. दोन्ही देशांची विशेष धोरणात्मक व जागतिक भागीदारी होणे आवश्यक आहे. जपानी कंपन्यांनी संरक्षण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करावी, अशी भारताची इच्छा आहे, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जपान हा भारताच्या विकासात महत्वाचा दुवा आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक महामार्गात जपानचा सिंहाचा वाटा आहे.

1 COMMENT

  1. हि चूक कदाचित अनावधानाने झली असेल.आता आपल्यला चीनवर कारवाई कशी करता येईल

    l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version