Home टॉप स्टोरी मोदी नाराज, स्वत:च्या मंदिराऐवजी आता भारत मातेचं मंदिर

मोदी नाराज, स्वत:च्या मंदिराऐवजी आता भारत मातेचं मंदिर

1

मोदीभक्त भाजपा कार्यकर्त्यांनी मंदिर उभारल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली- मोदीभक्त भाजपा कार्यकर्त्यांनी मंदिर उभारल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गुजरातमधील राजकोट येथे भाजपा कार्यकर्त्यांनी मोदींचे मंदिर उभारल्याचे उघडकीस आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली.

‘तुमच्याकडे पैसे व वेळ असेल तर अशी मंदिरे बांधण्याऐवजी त्याचा वापर स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावा’ अशा शब्दात मोदींनी त्यांच्या समर्थकांचे कान टोचले आहेत.

यानंतर मोदीभक्त नरमले असून राजकोट येथील मंदिरातील मोदींची मूर्ती झाकण्यात आली आहे. तसेच या मंदिरात आता भारतमातेची मूर्ती बसवली जाणार असल्याचे राजकोटमधील भाजपा कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

रिसा येथील कारागिरांनी या मंदिराचे बांधकाम केले आहे. या मंदिराचे १५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहन कुंदारिया यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

‘माझे मंदिर उभारल्याचे वृत्त वाचून मी दु:खी झालो आहे. आपल्या संस्कृतीत अशा प्रकारचे मंदिर बांधण्यास कधीच शिकवले जात नाही. कार्यकर्त्यांनी अशी मंदिरे बांधू नये’ असे आवाहन मोदींनी ट्विटरवरुन केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version