Home Uncategorized क्रिकेट विश्वचषक २०१५ मोहम्मद शामीचा धोनीवर कौतुकाचा वर्षाव

मोहम्मद शामीचा धोनीवर कौतुकाचा वर्षाव

1

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना एक मोकळेपणा जाणवतो, तो कधीही रागवत नाही, एक गोलंदाज म्हणून मला त्याचा फायदा होतो, अशा शब्दात मोहम्मद शामीने धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

ऑकलंड- महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना एक मोकळेपणा जाणवतो. तो कधीही रागवत नाही. त्याचे म्हणणे शांतपणे सांगून कौशल्याने परिस्थिती हाताळतो. एक गोलंदाज म्हणून मला त्याचा फायदा होतो अशा शब्दात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

गोलंदाज या नात्याने धोनीने आतापर्यंत माझ्याकडे कधीही विशिष्ट अशा गोलंदाजीची मागणी केलेली नाही. तो नेहमी मला माझ्या गोलंदाजातील्या चूका दाखवतो व भविष्यात चूका न करण्याचा सल्ला देतो. पण त्यामध्ये दाटवणीचा किंवा इशा-याचा सूर नसतो.

धोनी संघाला आणि गोलंदाज म्हणून मला ज्या पध्दतीने हाताळतो ते मला आवडते. त्याच्या नेतृत्वाखाली मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये पदार्पण केले. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना मला मोकळेपणा वाटतो मी कधीही तणावाखाली नसतो असे शामीने सांगितले.

दोन वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्य धोनीचे योगदान काय ? या प्रश्नावर शामीने धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला. सध्या चालू असलेल्या वर्ल्डकपमध्ये शामीची गोलंदाजी चांगलीच बहरली असून, पाच सामन्यात बारा फलंदाजांना बाद करुन भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version