Home देश म्हणून उपराष्ट्रपतींनी नाही दिली सलामी

म्हणून उपराष्ट्रपतींनी नाही दिली सलामी

1

राजपथावर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी न दिल्यावरुन सध्या सोशल मिडीयामध्ये वाद सुरु आहे. 

नवी दिल्ली – राजपथावर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी न दिल्यावरुन सध्या सोशल मिडीयामध्ये वाद सुरु आहे. यावर उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

राजशिष्टाचारानुसार उपराष्ट्रपती ज्या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित नसतात त्या कार्यक्रमात ते सलामी देत नाहीत. राजशिष्टाचारानुसार कार्यक्रमाचे प्रमुख आणि गणवेशात असलेले अधिकारी मानवंदना स्वीकारतात.

राजशिष्टाचारानुसार प्रजासत्ताक दिनी तीन्ही सैन्य दलांचे प्रमुख असणारे राष्ट्रपती मानवंदना स्वीकारतात. उपराष्ट्रपतींना फक्त उभे रहावे लागते असे उपराष्ट्रपतीचे विशेष अधिकारी गुरदीप सिंग सप्पल यांनी टि्वटरवरुन सांगितले.

संचलनानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी राष्ट्रध्वजाला सलाम केला तर, उपराष्ट्रपती अन्सारी उभे असल्याचे छायाचित्र सध्या सोशल मिडीयामध्ये फिरत असून, यावरुन वाद निर्माण झाला आहे.

1 COMMENT

  1. सर्वाना जागे होणे आवश्यक आहे.. देशाचा अपमान विरुद्ध कायदा बनवायास हवा आणि तसी शिक्षा हवी, मग तो मंत्री असो किंवा संत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version