Home महामुंबई म्हणे इलेक्ट्रीक बस आणणार

म्हणे इलेक्ट्रीक बस आणणार

2

शिवसेनेची मुंबई महापालिकेत २४ वर्षापासून सत्ता असताना बेस्ट परिवहनचे धिंडवडे निघाले आहेत. 

मुंबई – शिवसेनेची मुंबई महापालिकेत २४ वर्षापासून सत्ता असताना बेस्ट परिवहनचे धिंडवडे निघाले आहेत. साध्या बस चालवताना बेस्टच्या नाकीनऊ येत असताना आता मुंबईत इलेक्ट्रीक बस चालवण्याचे स्वप्न शिवसेना दाखवत आहे. पालिकेची सत्ता हातात असताना इलेक्ट्रीक बस का चालवल्या नाहीत, असा सवाल मुंबईकर करत आहेत.

[poll id=”790″]

भाजपशी फारकत घेतलेल्या शिवसेनेने पहिल्याच प्रचारसभेत फेकाफेकी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या हाती सत्ता द्या, बेस्टच्या बस इलेक्ट्रिक आणि सौर उर्जेवर चालवून दाखवतो, असे स्वप्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांना दाखवले. परंतु खुद्द मुंबईकरांनीच ठाकरे यांच्या या फेकाफेकीचा फुगा टराटरा फाडला आहे.

आधी तोटय़ात जाणारी बस सेवा नफ्यात आणून दाखवा, मगच इलेक्ट्रीकवर चालणा-या बसेसची स्वप्ने दाखवा. पालिकेची सत्ता आम्ही तुमच्या हाती दिलेली आहे,अशा शब्दांत सामान्य नागरिक शिवसेनेला सुनवत आहेत.

बेस्ट उपक्रमाचे दरदिवशी दीड कोटी रुपये बसवर इंधनासाठीच खर्च होतात. ‘आमच्या हातात राज्याची सत्ता दिल्यास सौर ऊर्जेवर चालणारी बस आणून दाखवतो’ असे गाजर मुंबईकरांना दाखवले. ज्या बेस्टबाबत त्यांनी हे स्वप्न दाखवले ती २४ वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. जेएनएनयुआरएमच्या निधीतून मिळणा-या पैशातून बस विकत घेण्यात आल्या.

बेस्टच्या ताफ्यात ४२८६ बस आहेत. मात्र, चालक आणि वाहकांअभावी ५०० बस आगारांमध्ये उभ्या आहेत. दिलीप पटेल,प्रवीण छेडा या भाजपच्या नगरसेवकांचा अपवाद वगळल्यास बेस्टचे सर्व अध्यक्ष शिवसेनेचे होते. विद्यमान बेस्ट समिती अध्यक्ष अरुण दुधवडकर, माजी अध्यक्ष अशोक पाटील, प्रभाकर शिंदे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत.

मात्र,सत्ता असूनही बेस्ट बस चालवल्या जात नसल्याचे उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सौर उर्जेवर चालणा-या बस चालवण्यासाठी हाती पालिकेतील सत्ता दिली. मात्र ते त्यांना साध्य करता आले नाही, तर राज्याची सत्ता देऊन कसे साध्य होणार ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
खुद्द शिवसैनिकांमध्येच ही कुजबूज रंगली होती.

‘साहेब बेस्ट बसचे काय बोलून बसले, बेस्ट तर आपल्याकडेच आहे. उलट बेस्टच तोटय़ात चालल्या आहेत आणि सौर उर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक बस चालण्यासाठी रस्ते तरी चकचकीत आहेत का?’ अशी चर्चा शिवसैनिकांमधून ऐकायला मिळत होती.

मुंबईकरांना गुंडाळायचा प्रयत्न!
सौरउर्जेचा वापर सार्वजनिक वाहतुकीच्या तसेच खासगी वाहनांसाठी करण्यास उपयुक्त नसल्याची माहिती उद्धव ठाकरेंना नसेल. काही वर्षापूर्वी ठाकरेंनी सौरउर्जा, कच-यापासून ऊर्जा, पवनचक्कीपासून ऊर्जानिर्मिती करून ती बेस्टला देण्याचे आश्वासने बेस्टमधील सत्ताधा-यांनी दिली होती.

परंतु एकाही प्रकल्पाची अंमलबजावणी त्यांनी केली नाही. केवळ भूलथापा मारून मुंबईकरांना गुंडाळण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. इलेक्ट्रिक बस आणण्यासाठी राज्यातील सत्तेची गरज नसून त्यासाठी बेस्टची सत्ता पुरेशी आहे.

शिवसेनेने मुंबईत या बस आणून दाखवाव्यात, नंतरच राज्यातील सत्तेची मागणी करावी. या बस त्यांनी यापूर्वीच का आणल्या नाहीत ?, असा प्रश्न बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस उदय आमोणकर यांनी केला.

2 COMMENTS

  1. आर वा राव , आमच्या गावाकड भी ह्यो बस पाटवा राव , काय रस्ते नाहीत!, नसणा का, गावापारात ईल कशीबशी , आलीकी आमी थांबून घेवू महिना दोन महिने, आजूबाजूचे गावचे लोक भी येतील कि बघायला , गावात चांगली जत्रा होईल कि राव, पिपाणी झोका फुगे मिठाई आर राव सगळच येईल कि गावात, तुमी मुंबैवले कराच राव ह्यान्या मोख्मंत्री लई मेहेर् बानी होईल , आर राव गावात आता काय राहीलच नाही पाणी लाईट मंत्री येत्यात कधी कधी पण आता ह्यात काही मज्जा राहिली नाही एकदा बघू ध्या अमान्स्नी हि बस डोल भरून .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version