Home देश युती तोडू नका- मोदींचे आदेश

युती तोडू नका- मोदींचे आदेश

1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही परिस्थितीत शिवसेना- भाजप युती तोडू नका, असे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली/मुंबई- जागावाटपावरुन शिवसेना- भाजपमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही परिस्थितीत युती तोडू नका, असे आदेश दिले आहेत.

शिवसेना- भाजप युती अभेद्य ठेवण्यासाठी मोदी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे समजते. शुक्रवार सकाळपासून युती तुटल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर झळकू लागल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने मोदी यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी युती कायम ठेवण्याची सूचना गडकरी यांना केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्याने भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मागितल्या आहेत. तर शिवसेनेने भाजपची मागणी धुडकावून लावली आहे. यावरुन दोन्ही पक्षांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. यामुळे २५ वर्षांनंतर शिवसेना- भाजप युती तुटणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर युती केली होती.
दरम्यान, आम्ही १३० जागांपेक्षा कमी जागा घेणार नाही, असे भाजपने ठणकावून सांगितले आहे. तर ११९ च्या वर जागा देणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

या संदर्भात भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत जागावाटपासंदर्भात अंतिम बैठक शुक्रवारी होणार आहे. स्वत: अमित शहा या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. अमित शहा यांनी भाजपमधील कोअर कमिटीतील सदस्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा निर्णय झाल्याचे कळते. मात्र, अधिकृत घोषणा होण्यास काही अवधी लागण्याची शक्यता आहे.

आजच्या बैठकीत भाजपची कोअर कमिटी पक्षाध्यक्ष अमित शहांना युती तोडण्याबाबत प्रस्ताव देईल. त्यानंतर पक्षाध्यक्ष शहा हा निर्णय पार्लमेंटरी बोर्डापुढे ठेवतील. त्यांची मंजूरी मिळाल्यानंतर याबाबतची घोषणा होणार असल्याचे समजते. त्यासाठी आज सायंकाळपर्यंत वेळ जाऊ शकतो.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही परिस्थितीत युती तोडू नका असे आदेश दिले असून तो निरोप घेऊन स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

[EPSB]

भाजपचे ‘एकला चलो रे’?

शिवसेना आणि भाजपमधील जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाही आणि गेल्या चार दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संपर्क नाही अशा वाढत्या तणावातच भाजपने  स्वबळाचा नारा देत ‘एकला चलो रे’ची आक्रमक भूमिका घेतली आहे.

[/EPSB]

1 COMMENT

  1. शहा आणि मोदिनी ,मराठी माणसाला लाचार समजू नये…
    शिवसैनिक मातोश्री सोडून दुसऱ्या कुणापुढे झुकत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version