Home टॉप स्टोरी युवराजांच्या रेंज रोव्हरला खड्ड्यांचा आचका

युवराजांच्या रेंज रोव्हरला खड्ड्यांचा आचका

0

खड्ड्यांमुळे युवराजांच्या रेंज रोव्हरचा टायर फुटला, युवराज, हे भोग आम्ही रोज भोगतो. तुमचाच टायर फुटला, आतातरी “करून दाखवा…”

नाशिक- “करून दाखवलं” म्हणत गावभर मिरवणा-या शिवसेनेच्या युवराजांनाच आज रस्त्यांतील खड्ड्यांचा प्रसाद मिळाला. नाशिक दौ-यावर जात असताना त्यांच्या रेंज रोव्हरचे दोन्ही टायर फुटले आणि दुस-या गाडीने जाण्याची नामुष्की युवराजांवर ओढवली.

त्याचे झाले असे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौ-यावर जात होते. मात्र घोटीनजीक त्यांच्या आलिशान रेंज रोव्हरचे दोन्ही टायर खड्ड्यात आचके बसून फुटले. या अपघातात आदित्य सुखरूप असले तरी राज्यातली जनता रोज काय भोग भोगते आहे, याचा अनुभव युवराजांनाही आला.

आदित्य यांच्या गाडीचा टायर फुटल्याने त्यांच्या सुरक्षा रक्षकांची एकच तारांबळ उडाली. टायर फुटलेली गाडी रेंज रोव्हर चक्क टोईंग करून नाशिकला न्यावी लागली. साक्षात युवराजांच्या गाडीला खड्ड्यांनी हिसका दाखवल्याने जागे झालेल्या शासनाने रस्त्याची पाहणी केली.

निवडणूका लागल्या कि शिवसेना “करून दाखवलं”ची होर्डिंग्स मुंबईभर लावते. मात्र ती होर्डिंग्स पाहत रस्त्यावरचे खड्डे चुकवण्याची कसरत सामान्य मुंबईकराला रोजच करावी लागते. खड्डेयुक्त रस्त्यांमुळे नादुरुस्त होणा-या गाड्या, जडणारे विविध विकार आणि अपघात मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेले आहेत. मात्र एका दिवसासाठी का होईना सामान्य मुंबईकरांचे हे हाल साक्षात रेंज रोव्हर मधून फिरणा-या युवराजांना भोगावे लागले. आता त्यांच्या पक्षाच्या ताब्यात असलेली महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खाते यातून काही धडा घेते का ते पाहायचे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version