Home मनोरंजन रणवीर तणावात?

रणवीर तणावात?

1

भलेही तुम्हाला रणवीर सिंह इव्हेंट्सदरम्यान, मौजमजा करताना दिसत असेल, पण कामाची वेळ येते, तेव्हा तो खूपच गंभीर बनतो.

भलेही तुम्हाला रणवीर सिंह इव्हेंट्सदरम्यान, मौजमजा करताना दिसत असेल, पण कामाची वेळ येते, तेव्हा तो खूपच गंभीर बनतो. मात्र त्याचं असं गंभीर होणं, आजकाल त्याची प्रेयसी असलेल्या दीपिका पदुकोनच्या चिंतेची बाब बनली आहे.

सध्या हे ‘लव्ह बर्ड्स’ संजय लीला भन्सालीच्या ‘बाजीराव-मस्तानी’च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटात रणवीर बाजीराव यांच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी रणवीरने टक्कलही केलं आहे. काही दिवसांपूर्वी तो एका हॉटेलमध्ये पाच-सहा दिवस होता, तिथे काही खास लोकांनाही रणवीर भेटला.

याचं कारण त्याने असं सांगितलं की, त्याला एकांतात बाजीरावचं कॅरेक्टर समजून घ्यायचं होतं; शिवाय या भूमिकेसाठी त्याला त्या दृष्टीने स्वत:ला तयारही करायचं होतं. पण ही बाब दीपिकाला मात्र पसंत पडलेली नाही. रणवीर ज्या प्रकारे स्वत:ला या भूमिकेत झोकून देत आहे, ते पाहता, तो तणावग्रस्तच जास्त होण्याची शक्यता दीपिकाला वाटते. आताही तो तणावात आहे. त्यामुळे दीपिकाने त्याला या तणावातून बाहेर येण्यास सूचवलं आहे. दीपिकाला असंही वाटतं की, जर रणवीर या भूमिकेत इतका शिरला तर त्यातून बाहेर येणंही त्याला पुढे कठीण जाऊ शकतं!

1 COMMENT

Leave a Reply to Pandudada. Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version