Home महामुंबई राखी सावंतचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

राखी सावंतचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

1

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणा-या राखी सावंतने शनिवारी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. 
मुंबई- लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणा-या राखी सावंतने शनिवारी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. राखीच्या या पक्षप्रवेशावेळी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते.

आपल्या चित्रपट आणि त्यातील वादामुळे सतत चर्चेत राहिलेल्या राखी सावंत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. यासाठी तीने स्वतःचा राष्ट्रीय आम पक्ष सुद्धा काढला होता. मात्र मतदारांनी दिला साफ नाकारले होते. उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी तीला केवळ एक हजार ९९७ मते दिली होती.

देशातील सर्वच प्रमुख राष्ट्रीय आणि प्रदेशीक पक्षात सिनेकलाकार आहेत. यात आता रिपब्लिकन पक्षाचा देखील समावेश झाला आहे. राखीच्या पक्ष प्रवेशामुळे रिपब्लिकन पक्षाचे स्टार चमकतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

1 COMMENT

  1. रामदासांनी ह्या बयेपासून सुरक्षित अंतर ठेवावे.सध्या तिला सिनेमात कामे मिळत नसल्याने प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी तिने आर पी आय पक्षात प्रवेश केला आहे.पुढे मागे जय्लालीताने एमजीआर ला मागे सारून आण्णादि एम के पक्ष कसा ताब्यात घेतला त्याप्रमाणे आठवले यांच्या पक्षाचे न होवो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version