Home क्रीडा राजस्थान रॉयल्स अंतिम फेरीत

राजस्थान रॉयल्स अंतिम फेरीत

1

माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्जवर १४ धावांनी मात करत राजस्थान रॉयल्सने चँपियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

जयपूर- माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्जवर १४ धावांनी मात करत राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी चँपियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा घरच्या मैदानावरील हा सलग १३वा विजय आहे. विजयात सातत्य राखणा-या रॉयल्सनी प्रथमच चँपियन्स लीगच्या ‘फायनल’मध्ये धडक मारली.

राजस्थानचे १६० धावांचे माफक आव्हान चेन्नईला पेलवले नाही. त्यांना आठ बाद १४५ धावा करता आल्या. मुंबईकर लेगस्पिनर प्रवीण तांबेची (४-०-१०-३) प्रभावी गोलंदाजीपुढे चेन्नईच्या फलंदाजांनी नांगी टाकली. तत्पूर्वी, आणखी एक मुंबईकर, सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या (५६ चेंडूंत ७० धावा) सर्वोत्तम खेळीच्या जोरावर राजस्थानने निर्धारित २० षटकांत आठ बाद १५९ धावा केल्या. रहाणेने सहा चौकार आणि दोन षटकार ठोकले.

अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने (२८ चेंडूंत ४६ धावा) फटकेबाजी करून सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र चेन्नईला विजय मिळवून देण्यात त्यालाही अपयश आले.

1 COMMENT

  1. Date : 5-10-13
    Sir,
    I am an engineer & also a writer. I would like to know whether any directory is published by Rane prakashan
    giving details of business establishments, real estate agents, business organizations, etc. in & around Sindhudurg.
    If such a directory is not published by you & if you know any such directory published by someone else do send me the name & address of the publishers or the address of the bookstore where I can get it.
    My native place is in Rajapur but our ancestors migrated to Mumbai some four hundred years back. Now there is no
    contact with Sindhudurg as none of my father’s family members is living in Konkan. If you know any online Marathi
    or English website which can provide the information sought do sent me the website addresses.
    My email address is : ykdeshmukh@yahoo.co.in
    Thanking you,
    Yours faithfully,
    yeshpal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version