Home टॉप स्टोरी राज्यपालांना धक्काबुक्की करणारे आमदार निलंबित

राज्यपालांना धक्काबुक्की करणारे आमदार निलंबित

2
Vidyasagar Rao

राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना धक्काबुक्की करणा-या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई- राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना धक्काबुक्की करणा-या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. हे सर्व आमदार काँग्रेसचे आहेत.

राज्यपाल विद्यासागर राव अभिभाषणासाठी सभागृहात जाताना काँग्रेसच्या आमदारांनी त्यांचा मार्ग अडवला. यावेळी राज्यपालांना धक्काबुक्की करण्यात आली. यात त्यांच्या हाताला जखम झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी नंतर राधाकृष्ण विखे यांनी दिलगिरी व्यक्त केली.

या आमदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव एकनाथ खडसे यांनी सभागृहात मांडला. या प्रकरणी काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, राहुल बोंद्रे, अब्दुल सत्तार, अमर काळे, विरेंद्र जगताप दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले. तर हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version