Home टॉप स्टोरी राज ठाकरेंचा दोषी पोलिसांना पाठिंबा

राज ठाकरेंचा दोषी पोलिसांना पाठिंबा

1

लखनभैय्या बनावट चकमक प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या सर्व पोलिसांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. 

मुंबई – रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या बनावट चकमक प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या सर्व पोलिसांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. शिक्षा झालेल्या या पोलिसांना जी मदत लागेल ती सर्व मदत आपण त्यांना करु असे राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकारपरिषेदत सांगितले.

या बनावट चकमक प्रकरणात सत्र न्यायालयाने वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह २१ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यात तेरा पोलिसांचा समावेश आहे. राज यांनी पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा आरोप केला. राज्य सरकाने पोलिसांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे असे ते म्हणाले. वरुन आदेश आल्याशिवाय पोलिस कोणाचे एन्काऊंटर करतील का ? असा सवालही त्यांनी विचारला.

प्रदीप सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी शनिवारी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज यांनी याविषयीची मनसेची भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी शिवसेनेनेही न्यायालयाने दोषी ठरवलेल्या पोलिसांचे समर्थन केले आहे.

प्रदीप सूर्यवंशी यांच्या पथकाने नोव्हेंबर २००६ मध्ये वाशीमधून चौकशीसाठी म्हणून लखनभैय्याला ताब्यात घेतले व नंतर त्याची हत्या केली होती. लखनभैय्याच्या भावाने या चकमकी विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयात ही चकमक बनावट असल्याचे सिध्द झाल्यानंतर सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. प्रदीप सूर्यवंशी यांच्या पथकावर हत्या आणि हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा आरोप होता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version