Home महाराष्ट्र कोकण रायगड जिल्ह्यातील क्रीडासंकुल लवकरच खुले

रायगड जिल्ह्यातील क्रीडासंकुल लवकरच खुले

1

अलिबाग जिल्हा क्रीडासंकुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त सापडला आहे. २१ मे रोजी या क्रीडासंकुलाचा लोकार्पण सोहळा आहे.

अलिबाग- जिल्हा क्रीडासंकुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त सापडला आहे. २१ मे रोजी या क्रीडासंकुलाचा लोकार्पण सोहळा आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय उदासिनता यामुळे रायगड जिल्हा क्रीडा संकुलाचे काम गेली २५ वर्षे रखडले होते. २५ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे क्रीडासंकुल खेळाडूंसाठी खुले होणार आहे.

रायगड जिल्ह्याचे क्रीडा संकुल बांधण्यासाठी १९८५ साली आलिबाग तालुक्यातील नेहुली येथील १० एकर जागा संपादीत करण्यात आली. त्यानंतर या जागेवर संरक्षण भिंत बांधण्याव्यतीरिक्त कोणतेही काम झाले नव्हते. २००१ सालच्या क्रीडा धोणानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. २००३ साली काढण्यात आलेल्या राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार रायगड जिल्हा क्रीडा संकुलासाठी ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

यात ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक, इंडोअर क्रीडा प्रकारासाठी हॉल, विविध खेळांची मैदाने, तरणतलाव, व्यायामशाळा, प्रेक्षागॅलरी यांचा समावेश होता. या पहिल्या टप्प्याच्या कामाला २००५ साली प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. २००९ मध्ये हे काम पूर्ण झाले. १५ ऑगस्ट २००९ रोजी या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच इनडोअरचे उद्घाटन रायगडचे तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यात इनडोअर हॉल, व्यायाम शाळा, प्रेक्षागृह व वसतीगृहाचा समावेश आहे. परंतु पाणी नसल्यामुळे त्याचा वापर होत नव्हता. मंजूर निधी पुरेसा नसल्याचे सरकारच्या लक्षात आल्याने क्रीडा संकुलासाठी आणखी ४ कोटी ७८ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर २०११ पासून दुसरा टप्पा आऊटडोअरचे काम सुरू करण्यात आले. फूटबॉल मैदान ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक, कबड्डी व खोखो मैदाना, लॉनटेनिस, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल, तरणतलाव, क्रिकेट खेळपट्टी या कामांचा समावेश आहे. रंगरंगोटी, वीजकरण, पाणीपुरवठा ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पाणीपुरवठा नसल्यामुळे इनडोअरचे काम पूर्ण होऊनही त्याचा वापर होऊ शकलेला नाही. आता त्यासाठी सरकारने निधी मंजूर केला आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. २१ मे रोजी पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन करण्यात येईल. एक महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येईल.    – सुनीता रिकामे, जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड

1 COMMENT

Leave a Reply to anwar anwar Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version