साप्ताहिक राशिभविष्य

0

साप्ताहिक राशिभविष्य, ६ मार्च ते १२ मार्च

मेष : शुभ अंक : ३, ४


कोणतेही काम शेवटाला जाईपर्यंत आपली सहनशक्ती टिकविणे आपणास थोडे जडच जाते. सध्या संयमाचे धडे आपणास गिरविणे गरजेचे आहे. सप्ताहातले लाभातले ग्रहमान आपणास हेच सांगत आहे. प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा. कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या. आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात.
वृषभ : शुभ अंक : २८, १ 
वादविवादात अडकू नका. सध्या तरी कौटुंबिक व वैवाहिक जीवनापेक्षा सामाजिक कार्य तसेच नोकरी व्यवसायातील कामांना प्राधान्य द्या. विद्यार्थी वर्गाने वेगळा धोका न पत्करणे हिताचे. आर्थिक आघाडीवरील सुधारणा महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. घरगुती घटना तुमच्या मनावर मळभ आणतील आणि त्यामुळे परिणामकारकरीत्या काम करणा-या तुमच्या क्षमतेचा ऱ्हास होईल. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल पण नंतर तुम्हाला जाणवेल जे झालं ते चांगल्यासाठीच होतं.
मिथुन : शुभ अंक : ८, ३
विचारातील दूरदर्शित्व, निर्णयातील ठामपणा आणि कामातील सातत्य यांची या सप्ताहात खूप गरज लागणार आहे. मनात संदेह निर्माण होईल. संशयाचे भूत हलकल्लोळ माजवेल. त्याचा परिणाम अनेक गोष्टींवर होऊ शकतो. भूतकाळातील घटनांवर वर्तमानात विचार करून फारसा उपयोग नाही. उलट तुमची मानसिक व शारीरिक ऊर्जा उगाच फुकट जाईल. रिअल इस्टेट व आर्थिक व्यवहारासाठी चांगला दिवस. कौटुंबिक ताणतणाव व दडपण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पण अनावश्यक काळजी तुमचा मानसिक ताण वाढवेल. कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने जितक्या लवकर मार्ग काढता येईल, तेवढय़ा लवकर मार्ग काढा.


कर्क : शुभ अंक : ३, ५

८ तारखेला निष्कारण निराशा येणे शक्य. सकारात्मक राहण्याचे प्रयत्न करावे लागतील. नोकरी-व्यवसायात द्विधा अवस्था होण्याची शक्यता. अशावेळी मोठय़ांचा सल्ला आणि पूर्वानुभव यांचा चांगला उपयोग होईल. चांगले आवडीचे वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमचे वरिष्ठ तुमचे मुद्दे आज समजून घेऊ शकत नाहीत. पण संयम ठेवा. भविष्यात त्यांना तुमचे मुद्दे पटतील. वैवाहिक जीवन तणावपूर्ण तरीही कौटुंबिक ऊर्जा देणारे असेल.
सिंह : शुभ अंक : ३, ५
६ तारखेला दिवसभराच्या कामात आरोग्याच्या समस्या हस्तक्षेप करू शकतात. व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. आपल्या राशीतला गुरू-राहू योग व आगामी चालणारा शनी-मंगळाचा योग आपणास सावधानता असावी. कोठेही ओव्हर अ‍ॅक्ट होऊ नका. स्वत:ची पथ्ये पाळा. तुमचा पारा चढल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही संकटात पडू शकता. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल.
कन्या : शुभ अंक : २८, ५

जिज्ञासा जागृत असणे हे आपले महत्त्वाचे लक्षण आहे. सप्ताहात त्याचा एकीकडे फायदाही होईल. कदाचित तोटाही होणे शक्य. माणसाची योग्य पारख करा. योग्य निर्णय वेळीच घ्यायला शिका. जास्त चिकित्सकपणा करू नका. वैवाहिक जीवनात कोणता संदेह येऊ देऊ नका. प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा. कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो. मुलांबरोबरील वादामुळे नैराश्य येईल. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला. नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. खासगी आणि गोपनीय माहिती कधीही उघड करू नका.
तूळ : शुभ अंक : २८, ३
आपला कलासक्त, समतोल आणि विचारपूर्वक असा स्वभाव या सप्ताहात गरजेचा आहे. साडेसातीचा शेवटचा टप्पा गोड होण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतील. विवेकवादी समतोल निर्णय महत्त्वाचे ठरतील. भावंडासंदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. कौटुंबिक पातळीवरील काही अडचणी, प्रश्नांमुळे घरातील शांतता आणि निरोगी वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या मनातले काही कळू शकणार नाही. आरोग्य प्रश्नावर मार्ग निघेल. संयम सोडू नका.

वृश्चिक: शुभ अंक : ३, ५

तुमच्या राशीतले शनी, मंगळ त्रासदायक होऊ शकतात. अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा होईल. विषारी असे बोलून शत्रूंची संख्या वाढवू नका. साडेसातीचा मध्य चालू आहे. त्यामुळे ही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. त्यातूनही सप्ताह गोड ठरू शकतो. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्टय़ा धमकी देणे टाळा. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल.

 

धनु : शुभ अंक : २८, ३
दिलदार मोठय़ा मनाचे व सकारात्मक विचारसरणीचे आपण. सध्या भाग्यातल्या गुरूमुळे प्रकाशझोतात आहात. कामाचा व्याप व मिळणा-या संधी वाढत्याच राहणा-या आहेत. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच धार देईल. तीर्थयात्रा किंवा धार्मिक कार्यक्रमातून मनोबल वाढते राहील. खाण्यापिण्याची पथ्ये पाळणे गरजेचे. मुलांच्या प्रगतीचाही आनंद घेता येईल.
मकर : शुभ अंक : २८, १
कष्ट करणासाठी आपण मागे कधी हटत नाही. तुमच्यापुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल. परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. त्वचाविषयक, गुढग्यांचा त्रास होऊ शकतो. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. कुठेही अविवेकी वागू नका. योग्यवेळी योग्य उपचार घ्या. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. निकटच्या सहकार्याशी अनेक मतभेद झाल्याने दिवस तणावपूर्ण जाईल. वैवाहिक जीवनात सध्या जोडीदाराचा चांगला प्रतिसाद असेल.
कुंभ : शुभ अंक : १, ३
आपला आहार नियंत्रणात ठेवा. सध्या रवी, बुध, शुक्र तुमच्या राशीतून जात आहेत. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. नोकरी-व्यवसायात सीमित व्यवहारातून अपेक्षित साध्य गाठता येईल. पायाची दुखणी होतील. तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. हृदयरोग असणा-यांनी विशेष काळजी घेणे हिताचे. दिनांक ८, ९ निष्कारण निराशा येणे शक्य. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप कठीण असेल. नवे व्यवहार, नवे प्रस्ताव स्थगित ठेवा. कुटुंबातील ज्येष्ठांची मध्यस्थी उपयुक्त.
मीन : शुभ अंक : ३, ५
या सप्ताहात आळस किंवा चालढकल यामुळे नुकसान होणे शक्य आहे. आरोग्याची चालढकल करू नका. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धावपळीमुळे तुम्ही थकून जाल. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. प्रवासातही पुरेशी काळजी घ्या. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. डोकेदुखी किंवा मूत्रविकार असणा-यांनी विशेष काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात सलोख्याचे वातावरण असेल. 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version