Home ताज्या घडामोडी रिझव्‍‌र्ह बँकेच्या परीक्षेत मराठी मुलांवर अन्याय

रिझव्‍‌र्ह बँकेच्या परीक्षेत मराठी मुलांवर अन्याय

1

पुणे – रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहायक लिपिक या पदासाठी ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबईतील २६४ जागांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप मराठी परीक्षार्थीनी केला आहे. या परीक्षेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान जाणून घेण्यासाठी एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यात पहिल्या २ फे-यांमध्ये पास झालेल्या ३०० हून अधिक मराठी परीक्षार्थीना नापास करण्यात आले आहे, तर त्या जागी अमराठी मुलांना पास करण्यात आले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहायक लिपिक पदासाठी ऑक्टोबर २०१७ मध्ये परीक्षा घेण्यात आली. यातील पहिला आणि दुसरा टप्पा आईबीपीएस आणि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. दुस-या टप्प्यातून ६६६ परीक्षार्थीची निवड करण्यात आली. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०१८ रोजी परीक्षार्थीना मराठी भाषा लिहिता वाचता येते का, या बाबतची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला प्रत्यक्षात किती गुण आहेत, हेही सांगण्यात आले नव्हते.

1 COMMENT

  1. गुजराथी मुले हि बँकिंग क्षेत्रात खूपच नॉलेजबल असतात. ते सहसा सी ए वगैरे पास असतात. मराठी मुले फार तर बीकॉम पर्यंत मजल मारतात. किव्वा अजून जास्तीजास्त कुठल्यातरी आंडूपांडू इन्स्टिट्यूट मधून एम बी ए. मग अशांना कशे आर बी आय सारख्या प्रेस्टीजियस संस्थेत नोकरी मिळणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version