Home टॉप स्टोरी जाणून घ्या रेल्वे अर्थसंकल्प २०१४-१५

जाणून घ्या रेल्वे अर्थसंकल्प २०१४-१५

2

केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी नरेंद्र मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. रेल्वेच्या आधुनिकरणासाठी आणि प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि सुरक्षा देणा-या घोषणा गौड यांनी केल्या आहेत. या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा आणि तरतूदी….

» रेल्वे अर्थसंकल्प २०१४

» भारतीय रेल्वे अर्थव्यवस्थेचा आत्मा- रेल्वेमंत्री सदानंद गौडा
» भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी मालवाहतूक व्यवस्था
» प्रवासी आणि महिला सुरक्षेला प्राधान्य देणार
» रेल्वे प्रतिक्षालय आणि अन्य सुविधांचा दर्जा सुधारण्यावर भर
» रेल्वेला प्रभावी आणि प्रवासीभिमुख बनवणार

» पर्यायी उत्पन्नासाठी परदेशी गुंतवणुकीसाठी प्रयत्न करणार
» रेल्वेचे ३५९ प्रकल्प प्रलंबित
» प्रथम प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यास प्रधान्य

»  केवळ भाडेवाढीवर रेल्वेला अवलंबून राहता येणार नाही- रेल्वे मंत्री

» नुकत्याच करण्यात आलेल्या भाडेवाढीमुळे रेल्वेच्या उत्पन्नात आठ हजार कोटी रुपयांची वाढ झाली

»  ज्येष्ठ नागरिकांना फलाटावर सहजपणे जाण्यासाठी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात सुविधा निर्माण करणार

» सर्व रेल्व स्थानकावर एफओबी, सरकते जिने आणि शौचालय

» महिलांच्या सुरक्षेसाठी चार हजार महिला पोलिसांची भरती केली जाणार
» १७ हजार रेल्वे पोलिसांच्या मदतीने प्रवाशांची सुरक्षा

» देशात बुलेट रेल्वे प्रकल्पाला लवकरच सुरुवात करणार
» मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा
» गदग(कर्नाटक)-पंढरपूर रेल्वे सुरु करणार

» सर्व ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्थानकावर वाय-फाय सुविधा देणार 
» गोवा-मुंबई, नागपूर-विलासपूर,नागपूर-सिंकदराबाद,नागपूर-कानपूर,दिल्ली-अमृतसर,दिल्ली-चंदीगड या मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार

» इंधनासाठी बायो डिझेलचा वापर
» रेल्वे स्थानकावर सोलर पॅनल बसवणार
» इशान्य भारतात २३ प्रकल्प
» दूध वाहतूकीसाठी विशेष रेल्वे धावणार
» देशभरात नव्या १८ मार्गासाठी सर्वेक्षण सुरु
» येत्या पाच वर्षात पेपर लेस रेल्वे कार्यालय, सर्व रेल्व स्थानकावर डिजीटल आरक्षण चार्ट बसवणार

» पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार रेल्वेचे तिकीट

» नव्या २७ एक्स्प्रेस गाड्यांची घोषणा, पाच जनसाधारण, पाच प्रिमियम, सहा एसी, आठ पॅसेंजर, पाच डीइएमयू आणि दोन एमइएमयू गाड्या सुरु करणार

» रेल्वे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले

» फळ भाज्यांची वाहतूक करण्यासाठी विशेष कोल्ड स्टोरेज असलेल्या गाड्या
» औरंगाबाद- चाळीसगाव, सोलापूर-तुळजापूर नव्या मार्गाचे सर्वोक्षण करणार- रेल्वे मंत्री
» कसारा-इगतपुरी दरम्यान चौथा मार्ग सुरु करणार

» अर्थसंकल्पात रेल्वे आधुनिकीकरणावर आणि पारदर्शक कारभारावर भर
» या अर्थसंकल्पामुळे रेल्वेच्या विकासाला गती मिळणार- नरेंद्र मोदी

 

2 COMMENTS

  1. हेय सर्व गर्दीचे फोटो टाकलेत न …..सर्व कॉंग्रेस ने केकेले कर्म आहे …..तय मुलेच अशी स्तिती झालीय रेल्वे ची..भारता मध्ये…!!!

  2. रेल्वे संकल्प भ्जापाचा आणी फोटो ताक्लाय्ते कॉंगेस चा कर्माचे…!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version