Home देश रेल्वे कर्मचारी ११ जुलैपासून बेमुदत संपावर

रेल्वे कर्मचारी ११ जुलैपासून बेमुदत संपावर

1
संग्रहीत छायाचित्र

नवीन पेन्शन योजना आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी रेल्वे कामगार संघटना येत्या ११ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

संग्रहीत छायाचित्र

नवी दिल्ली- नवीन पेन्शन योजना आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी रेल्वे कामगार संघटना येत्या ११ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. ११ जुलैला सकाळी ६ वा.पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची नोटीस आम्ही गुरुवारी रेल्वे व्यवस्थापनाला देऊ, अशी माहिती ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस एस. गोपाल मिश्रा यांनी दिली.

सहा महिन्यांपूर्वी आम्ही आमच्या मागण्या रेल्वेला सादर केल्या होत्या. परंतु सरकारचा आमच्याकडे पाहण्याच्या तुच्छतेच्या दृष्टिकोनामुळे संप अटळ बनला आहे, असा दावा त्यांनी केला. रेल्वेचे १३ लाख कर्मचारी असून त्यांच्या संपामुळे देशभरातील रेल्वे सेवा ठप्प होईल. त्याचा फटका तमाम देशवासीयांना बसणार आहे. वरील मागण्यांशिवाय रेल्वेतील रिक्त पदे भरण्याची मागणीही युनियन्सने केली आहे.

नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन्स संघटनेनेही या संपाला पाठिंबा दिला आहे. संपावर जाणार असल्याच्या नोटिसा आम्ही गुरुवारी सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देऊ, असे सरचिटणीस एम. राघवय्या यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version