Home महामुंबई रेल्वे मार्गावर २४ तासांत १७ प्रवाशांचा बळी

रेल्वे मार्गावर २४ तासांत १७ प्रवाशांचा बळी

1
संग्रहित छायाचित्र

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर गेल्या २४ तासांत लोकलखाली पडून १७ जणांचा मृत्यू झाला.

संग्रहित छायाचित्र

मुंबई- मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अपघातांचे सत्र सुरु असून गेल्या २४ तासांत लोकलखाली पडून १७ जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर सर्वाधिक अपघात कल्याण स्थानकात झाल्याचे समजते.

कल्याण येथील अपघातात ३ पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. तर डोंबिवली, ठाणे, कुर्ला, सीएसटी, चर्चगेट, अंधेरी, बोरिवली, वसई रोड, पालघर, वडाळा, वांद्रे या स्थानकांवर झालेल्या अपघातात एकूण ११ जणांनी जीव गमावला आहे. तर जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर फलाटांची उंची वाढवण्याचे काम सुरु आहे. मात्र गर्दी आणि लोकल पकडण्याची घाई हेच अपघातांमागील मुख्य कारणे असल्याचे रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. मृतांमध्ये ११ पुरुष आणि तीन महिला असून चार मृतदेहांची ओळख अद्यापही पटली नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

लोकलमधून दररोज ७५ लाख प्रवासी प्रवासी करतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस जनजागृती मोहीम राबवतात. मात्र अपघातात प्रवाशांचा बळी घटना दिवसेंदिवस वाढत आहे.

1 COMMENT

  1. या ,या , आमच्या मुंबईत या,आणि लोकल खाली मरा ….. उ पी, bihari,सगळ्यांनी या आणि mumbaichi वाट लावा ,!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version