Home महामुंबई रेल्वे स्थानकांनी घेतला श्वास!

रेल्वे स्थानकांनी घेतला श्वास!

1

रेल्वे स्थानकांतील फेरीवाल्यांच्या आरोळ्यांचे प्रमाण आता काहीसे कमी झाल्याचे चित्र सध्या मुंबईतील रेल्वे स्थानकांवर दिसत आहे.

मुंबई- रेल्वे स्थानकांतील फेरीवाल्यांच्या आरोळ्यांचे प्रमाण आता काहीसे कमी झाल्याचे चित्र सध्या मुंबईतील रेल्वे स्थानकांवर दिसत आहे. मुंबईतील लोकलच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वे स्थानकेदेखील अपुरी पडू लागली आहेत, मात्र या गर्दीतही फेरीवाले दुकान थाटून बसत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर रेल्वे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील फेरीवाल्यांना हद्दपार करण्याचा पवित्रा घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७१५ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून, ६ लाख १२ हजार १५५ रुपयांची दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे पोलिसांनी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांवर केलेल्या कारवाईत चर्चगेट स्थानकात २५, मुंबई सेंट्रल ४९, दादर ६५, वांद्रे ४५, अंधेरी ९४, बोरिवली १०८ तर विरार स्थानकात २१४ फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. मुंबईतील अंधेरी, वांद्रे, दादर, बोरिवली यांसारख्या स्थानकांत पादचारी पुलांवर फेरीवाल्यांचे प्रमाण अधिक असल्याने असल्याने चालणेदेखील कठीण झाले होते.

शिवाय फेरीवाल्यांमुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात कच-याचे साम्राज्यदेखील पसरत होते. मुंबईतील महत्त्वाच्या दादर स्थानकातील चर्चगेटच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलावर फेरीवाल्यांमुळे चालणे  प्रवाशांना कठीण झाले होते. अखेर रेल्वे पोलिसांनी कारवाई करून फेरीवाल्यांना हटवल्याने येथील प्रवाशांना या मोहिमेचा अधिक फायदा झाला आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून आलेल्या आदेशानंतर मध्य रेल्वेनेदेखील अशी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे येणा-या काळात ही मोहीम सुरू राहिल्यास मुंबईतील रेल्वे स्थानके फेरीवालामुक्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

1 COMMENT

  1. मुंबईतील लोकलच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ती का व कोणत्या? कारणाने याचा विचार रेल्वे मंत्र्यांनी केल्यामुळे मध्य व हार्बर रेल्वेचे प्रवाशी जरी आभार मानत नसले तरी पश्चिम रेल्वेचे प्रवाशी त्यांचे आभार मनातील. त्याचप्रमाणे आता विरारपर्यंतचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे उद्या जर किमान दोन वर्षांनी तेथे आजच्या तुलनेत दुपटीने प्रगती झाली तर वेळीच रेल्वेमंत्र्यांनी तेथील लोकलची परिस्थिती बघून लोकल हि १२ डब्ब्यांची तयार न करता किमान २१ डब्ब्यांची तरी करण्यास प्रयत्नशील राहावे. फेरीवाले हे जागोजागी असले पाहिजे, कारण मुंबईच्या गदारोळात प्रत्येक व्यक्ती घरी ज्या वस्तू न्यावयाच्या असतात, ते धीत्तो गजनी चित्रपटातील आमिर खानच्या भूमिकेसारखे विसरत असतात. तेव्हा कोणी जर चप्पल ले लो, बिस्कीट ले लो, बनियान ले लो, भाजी रु. ५ का, सेब लेलो, केले लेलो असे आवाज दिले कि त्या व्यक्तीच्या लक्षात येते ती घरातील उपयोगी वस्तूची कमतरता. त्यामुळे जर रेल्वेमंत्र्यांनीच जर या गोष्टीचा आक्षेप घेतला असेल, तर सामान्य जनता तरी काय करणार? पण याच बरोबर विरार आणि डहाणू पर्यंतच्या लोकलचा हि विचार करावा. ते जर शक्य होत नसेल तर जी मेल मुंबई सेन्ट्रल पर्यंत पाठवण्यात येते तिचा किमान २ ते ३ मिनिटांनी विरार ते चर्चगेट पर्यंत सोडण्यात यावी. धन्यवाद. मी मुंबईकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version