Home महामुंबई रेल्वे हद्दीतील गुन्हेगारांना आता प्रवाशांचाच चाप

रेल्वे हद्दीतील गुन्हेगारांना आता प्रवाशांचाच चाप

1

रेल्वे हद्दीत घडणारे गुन्हे रेल्वे पोलिसांच्या किंवा रेल्वेच्या नजरेस आणून देणा-या प्रवाशांना रेल्वेने किमान एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतचे इनाम देण्याची घोषणा केली आहे.

मुंबई- रेल्वेमार्गावरील गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत असले, तरी त्या प्रमाणात पोलिसांची संख्या वाढवणे शक्य नसल्याने आता मध्य रेल्वेने या गुन्ह्य़ांना चाप लावण्यासाठी एक नवा फंडा आणला आहे. रेल्वे हद्दीत घडणारे गुन्हे रेल्वे पोलिसांच्या किंवा रेल्वेच्या नजरेस आणून देणा-या प्रवाशांना रेल्वेने किमान एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतचे इनाम देण्याची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे ही योजना खासगी गुप्तहेरांसाठीही लागू आहे. रेल्वेमार्गावर सध्या सोनसाखळी चोरी, पाकीटमारी, मोबाइल-लॅपटॉप चोरी किंवा बॅगेची चोरी अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. या गुन्हेगारांना पकडण्याचे अथक प्रयत्न करूनही पोलिसांना त्यात फारसे यश येत नाही. यामुळे आता मध्य रेल्वेने ४५ लाख प्रवाशांनाच ’पोलीस’ बनवले आहे.

या प्रवाशांनी अशा कोणत्याही गुन्ह्य़ाचा असा पुरावा रेल्वेसमोर आणावा, ज्या पुराव्याच्या आधारे गुन्हा नोंदवता येईल. अशा प्रवाशांना किमान एक हजार ते पाच हजार रुपयांचे इनाम रेल्वे प्रशासना तर्फे दिले जाणार आहे. हा गुन्हा दाखल झाल्याशिवाय इनाम हाती मिळणार नसल्याचेही मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

रेल्वे स्थानकातील ५९ फलाटांची उंची वाढणार

रेल्वे स्थानकातील फलाटांच्या उंचीमुळे अनेकांना अपंगत्व अथवा जीव गमवावा लागला आहे. मोनिका मोरे प्रकरणानंतर तर फलाटावरील जीवघेणी पोकळी कमी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर मध्य रेल्वेने आपल्या स्थानकांवरील ८३ फलाटांची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. या ८३ पैकी २४ फलाटांची उंची सहा महिन्यांत वाढणार आहे. यासाठी तब्बल साडेदहा कोटींचे कंत्राट मंजूर झाले असून चार फलाटांची उंची वाढवण्यात आली आहे. उर्वरित ५९ फलाटांची उंची वाढवण्याचे काम मे २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

मोनिका प्रकरणानंतर उपनगरीय स्थानकांवरील फलाटाच्या उंचीचा प्रश्न चच्रेत आला. मुंबई उच्च न्यायालयानेही रेल्वेला ८३ फलाटांची उंची वाढवण्याचे आदेश दिले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या हद्दीत एकूण ७६ स्थानके असून फलाटांची संख्या २७३ आहे. त्यापैकी २४३ फलाट धीम्या मार्गावरील आणि ३० फलाट जलद मार्गावर आहेत. या २७३ पैकी १९० फलाटांची उंची ८४० मिमी किंवा त्यापेक्षा जास्त आहे, मात्र उर्वरित ८३ फलाटांची उंची प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकते.

1 COMMENT

  1. ह्या पोलिसांच्या लफड्यात सर्वसाधारण प्रवासी पडणार नाहीच ,पोलिसांचे नाते फक्त गुंडानपर्यंत,आणि प्रवाश्यांना हि लफडी हवीतच कशाला ??? दोनचार प्रवाशी गुंडान kadoon maar खातील आणि choop बसतील ,police aaram karat बसतील,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version