Home क्रीडा रोहतकमध्ये सचिन राहणार कुठे?

रोहतकमध्ये सचिन राहणार कुठे?

0

रणजी ट्रॉफीत हरयाणाविरुद्धच्या सलामीच्या लढतीत रोहतकमध्ये विक्रमवीर सचिन तेंडुलकर कुठे राहणार, असा प्रश्न आयोजकांना पडला आहे. 

नवी दिल्ली- रणजी ट्रॉफीत हरयाणाविरुद्धच्या सलामीच्या लढतीत रोहतकमध्ये विक्रमवीर सचिन तेंडुलकर कुठे राहणार, असा प्रश्न आयोजकांना पडला आहे.

रोहतकमध्ये पंचतारांकित दूरच, पण ‘फोर स्ट्रार’ किंवा ‘थ्री स्टार’ हॉटेल नाही. त्यामुळे विक्रमवीरासह विद्यमान राज्यसभा खासदाराला राहण्यासाठी आयोजकांना हरयाणा सरकारच्या शासकीय विश्रांतीगृहांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सचिनसाठी माझ्या घरचे दरवाजे खुले आहेत, असे हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनी म्हटले आहे. केवळ सचिनच नव्हे तर मुंबई रणजी संघ आणि सपोर्ट स्टाफच्या राहण्याचा प्रश्नही सतोवतोय. रोहतकमधील रिव्होली हॉटेलमध्ये १५ पेक्षा अधिक खोल्या नाहीत.

त्यामुळे पाहुण्या संघाला दोन हॉटेलांमध्ये वास्तव्य करावे लागेल. रणजी ट्रॉफीतील सलामीच्या लढतीत गतविजेता मुंबई यजमानांशी दोन हात करेल. २७ ऑक्टोबरपासून लाहिलीत ही लढत रंगेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version