Home टॉप स्टोरी लख्वी आणखी महिनाभर तुरुंगातच रहाणार

लख्वी आणखी महिनाभर तुरुंगातच रहाणार

1

२००८मधील मुंबईवरील दहशवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झकी उऱ रेहमान लख्वी आणखी महिनाभर तुरुंगातच राहणार आहे..

इस्लामाबाद – २००८मधील मुंबईवरील दहशवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झकी उऱ रेहमान लख्वी आणखी महिनाभर तुरुंगातच राहणार आहे.

शुक्रवारीच इस्लामाबाद उच्च न्यायालयाने लख्वीची अटक बेकायदा असल्याचे सांगत त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयावर भारताने तीव्र शब्दात पाकिस्तानला सुनावले होते. लख्वी तुरुंगाबाहेर येणार नाही याची पाकिस्तानने काळजी घ्यावी असे भारताने म्हटले होते.

त्यानंतर दुस-याच दिवशी लख्वीला पुन्हा एकदा ताब्यात घेण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. बचावपक्षाचे वकील रिझवान अब्बासी यांनी ही माहिती दिली.

लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर असलेल्या लख्वीने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट रचला, अर्थसहाय्य केले आणि अंमलबजावणीत महत्वाची भूमिका बजावली होती. या हल्ल्यात १६६ निष्पाप नागरीकांना आपला प्राण गमवावा लागला होता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version