Home देश लष्कराच्या नववर्ष स्वागताच्या पार्ट्या रद्द

लष्कराच्या नववर्ष स्वागताच्या पार्ट्या रद्द

1

दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील तरुणीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर लष्कराने नववर्ष स्वागताच्या सर्व पार्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली – दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील तरुणीच्या मृत्यूने संपूर्ण देश हळहळत असताना, लष्करानेही नववर्ष स्वागताच्या सर्व पार्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

लष्कराने सर्व विभागांसाठी परिपत्रक काढून नववर्ष स्वागताच्या पाटर्या आयोजित न करण्याच्या सूचना केल्या आहेत. संरक्षण मंत्री ए.के.अँन्थोनी यांच्यासाठीही हे नववर्ष अत्यंत साधेपणाचे असणार आहे असे संरक्षण मंत्रालयातील अधिका-यांनी सांगितले.

दिल्ली बलात्काराच्या घटनेमुळे अँन्थोनी यांनी यंदा त्यांच्या वाढदिवसाच्याही शुभेच्छाही कोणाकडूनही स्वीकारल्या नाहीत असे सूत्रांनी सांगितले.

लष्करप्रमुख बिक्रम सिंग आणि त्यांच्या पत्नी बबल्स सिंग नववर्षाच्या पहिल्या दिवशी लष्करी रुग्णालयाला भेट देऊन मिठाईचे वाटप करणार आहेत. नौदल आणि हवाई दलानेही या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व विभागांना पार्ट्या आयोजित न करण्याचे परिपत्रक काढले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version