Home गॅलरी लष्कराच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

लष्कराच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

1

भारतीय भूदल, भारतीय हवाई दल व भारतीय नौदल अशा तीनही दलांच्या वतीने शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय लष्करी मेळाव्याच्या निमित्ताने रणगाडे, बंदुका पाहण्याची  संधी मिळाली आहे.

मुंबई – मोठमोठे रणगाडे व बंदुका, उंच सैनिक, मिसाइल्स अशा प्रकारचे वातावरण एखाद्या सैनिकी शाळेतच अथवा युद्धभूमीवरच अभुवायला मिळते. परंतु हे सर्व अनुभवण्याची संधी मुंबईकरांना भारतीय भूदल, भारतीय हवाई दल व भारतीय नौदल अशा तीनही दलांच्या वतीने शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय लष्करी मेळाव्याच्या निमित्ताने मिळाली आहे. या मेळाव्यात थरारक कवायती पाहण्यासाठी शनिवारी मोठी गर्दी झाली होती.

लोकांच्या माहितीसाठी या मेळाव्यात भारतीय तीनही दलांत वापरण्यात येणारी शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाणी तैनात असलेले सैनिक येणा-या नागरिकांना माहिती देत आहेत. फ्लॉयचेकर रडार सर्वाचे आकर्षण ठरत असून, ते एका मिनिटात ३०० परिक्षेत्रात फायरिंग करू शकते. एल/७० ही गन आकाशात उडणा-या कोणत्याही शस्त्राला टार्गेट करू शकते, ‘टँक टी ९०’ चे वजन ४६. ५ टन असून, त्याचा वेग प्रतितास ३५ किलोमीटर आहे. जनरल डाटा टी ७२ एमचा वेग महामार्गावर ५०० किमी तर क्रॉस कन्ट्रीमध्ये ३२० ते ४८० किमी आहे, गन डाटा बीएमपी दोन याची वैशिष्ट्ये म्हणजे त्यातून पाण्यातून बोटीप्रमाणे प्रवास करता येतो. त्याची निर्मिती आंध्र प्रदेश येथे केली जाते. सायलेंट फ्युचर बाएमपी दोन मध्ये सैनिक आठ ते सात तास आतमध्ये राहू शकतात. १३० एमएम ही गन २७.५ किमीपर्यंत फायरिंग करू शकते. मेळाव्यातील ही शस्त्रे पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वाचीच गर्दी होत आहे.

फोटो गँलरी पहा…

1 COMMENT

  1. It’s important to also guarantee that all your questions have got prior to
    treatment begins. Clinics which provide Laser Hair
    removal treatment would generally ask anyone below
    the age of 18 to fill in a legal guardian’s consent form, the
    treatment would require the consent of both the parent and child.
    Patients seek to plump out wrinkles with laser treatments.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version