Home देश लालू प्रसाद यांना बंगला रिकामा करण्याचे आदेश

लालू प्रसाद यांना बंगला रिकामा करण्याचे आदेश

1

न्यायालयाने शिक्षा सुनवल्यामुळे खासदारकी रद्द झालेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील सरकारी बंगला लवकरच सोडवा लागणार आहे.
नवी दिल्ली- न्यायालयाने शिक्षा सुनवल्यामुळे खासदारकी रद्द झालेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील सरकारी बंगला लवकरच सोडवा लागणार आहे.

दिल्लीतील तुगलक मार्ग येथील बंगल्यात आणखी काही दिवस राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती यादव यांनी केली होती. मात्र नागरविकास मंत्रालयाने त्यांनी विनंती फेटाळून लावल्याचे अधिका-यांनी सांगितले.

यादव यांना याआधी अनेक वेळा बंगला सोडण्याची नोटीस दिली होती. हा बंगला सोडण्याची ३१ ऑक्टोबर ही तारीख त्यांनी पाळली नसल्याचे अधिकारी म्हणले. गेल्याच आठवड्यात त्यांनी नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांना पत्र लिहले होते. मात्र त्यांची विनंती फेटाळून लावली असून यासंदर्भातील निर्णयाची माहिती त्यांना देण्यात आली आहे.

लालू प्रसाद यांना घर सोडण्यासाठी आणखी काही कालावधी देण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे मंत्रालयातील अधिकारी म्हणले.

या बंगल्यात लालू २००४पासून राहत आहेत. मात्र चारा घोटाळा प्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.

त्यानंतर त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री कमलनाथ यांना या घरात राहण्याची विनंती केली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांना ३१ ऑक्टोबर २०१४पर्यंत राहण्याची परवानगी दिली होती.

राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुखाला दिल्लीत राहण्यासाठी सरकारी बंगला दिला जातो. मात्र खासदारकी रद्द झाल्यासह लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही गमवला आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीत नवा निवारा शोधावा लागणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version