Home महामुंबई लोअर परळमध्ये सापडला नाग

लोअर परळमध्ये सापडला नाग

0

लोअर परळ येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना बुधवारी दुपारी साडेचार फुटांचा नाग सापडला. 

मुंबई- लोअर परळ येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना बुधवारी दुपारी साडेचार फुटांचा नाग सापडला. यामुळे येथील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांनी या नागाला पकडून हाफकिन संशोधन केंद्राच्या स्वाधीन केले.

मुंबई-ठाणे या शहरांबाहेर असलेल्या जंगलामध्ये मोठेमोठे टॉवर उभारण्यात येत आहेत. याचा परिणाम वन्य जिवांवर होत आहे. लोअर परळ भागात बुधवारी याची प्रचिती आली. या नागाला पाहताच कामगारांनी आरडाओरडा केला. या नागाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन नागाला पकडले.

या नागाला आपल्याजवळील गोणीत टाकून पोलिसांनी हा नाग हाफकिन संशोधन केंद्राच्या स्वाधीन केला. परंतु मुळातच हा नाग लोअर परळ सारख्या परिसरात आढळल्याने काही काळ लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version