Home देश लोकसभा अध्यक्षांनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

लोकसभा अध्यक्षांनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

0

विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेच्या कामकाजाचे तास वाया जात असल्याने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.

नवी दिल्ली – विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेच्या कामकाजाचे तास वाया जात असल्याने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.

लोकसभेचे कामकाज व्यवस्थित चालावे हा या बैठकीमागचा उद्देश आहे. या संदर्भात लोकसभा अध्यक्ष गुरुवारी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील. २१ जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे मात्र अद्यापपर्यंत एकही तास कामकाज व्यवस्थित होऊ शकलेले नाही.

अधिवेशनाचे दिवस वाया जात आहेत. ललित मोदी प्रकरणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि व्यापम घोटाळयात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.

काँग्रेस संसदेत जो विरोध करत आहे, आंदोलन करत आहे ते लोकसभा वाहिनीवरुन दाखवण्यात येत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते असे काँग्रेस खासदार सुरेश कोडीकुन्नी यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version