Home Uncategorized क्रिकेट विश्वचषक २०१५ वर्ल्डकप जिंकला आणि डोळयात अश्रू तरळले- सचिन

वर्ल्डकप जिंकला आणि डोळयात अश्रू तरळले- सचिन

2
Sachin Tendulkar at the launch of his autobiography

भारताने २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकला तो माझ्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण होता. माझ्या डोळयात आनंदाने अश्रू तरळले होते.

नवी दिल्ली – भारताने २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकला तो माझ्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण होता. माझ्या डोळयात आनंदाने अश्रू तरळले होते. ते अनमोल क्षण होते अशा शब्दात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने २०११ च्या वर्ल्डकप विजयाच्या आठवणी जागवल्या.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला नमवले त्या क्षणी सर्वप्रथम मी देवाचे आभार मानले. मी किंचाळलो आणि ड्रेसिंग रुममधून थेट मैदानावर धावत सुटलो.

मैदानाच्या मध्यभागी पोहोचलो आणि माझ्या डोळयात अश्रू आले. मी रडलो. माझ्या आयुष्यातला एकमेव प्रसंग असेल जेव्हा मी आनंदाने रडलो. ते अनमोल क्षण होते. हे असे क्षण असतात ज्यांची तुम्ही फक्त कल्पना करु शकता असे सचिन म्हणाला.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिनने वर्ल्डकप विजयाला असलेली भावनिक किनार उलगडली. त्या रात्री ड्रेसिंग रुममध्ये आमच्या विजयामध्ये आमचे कुटुंबिय, मित्र आणि चाहतेही सहभागी झाले होते. वर्ल्डकप उचलला तो आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण होता. हा माझा कप नव्हता हा देशाचा कप होता असे सचिनने सांगितले.

2 COMMENTS

  1. खूप कमावले आहे सचिन ने.
    आता सचिन ने काहीतरी या देशाला परत द्यायची वेळ आली आहे. नुसत्याच पैशांची गोष्ट करत नाही मी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version