Home ऐसपैस विमानतळावरील रिटेलिंग झेप घेणार

विमानतळावरील रिटेलिंग झेप घेणार

0

सौदी अरेबियातील खुरैस वाळवंटातील उच्चशिक्षित ऑईल रिग प्रोफेशनल प्रेडो डिकोस्टा ३५ दिवस कार्यक्षेत्रात, तर ३५ दिवस घरी, असे आलटून-पालटून काम करतात. दर ३५ दिवसांनी, प्रेडो बोरिवली या मुंबईतील उपगनरात जातात. तेथे त्यांचे कुटुंब त्यांची आतुरतेने वाट बघत असते.

डिकोस्टा कुटुंब प्रेडोला भेटण्यासाठी उतावळे झालेले असते. विशेषत: तेल क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी तोंड द्याव्या लागणा-या घातक घटकांमुळे त्यांची चिंता आणखी वाढते. प्रेडो येताना मार्लबोरो, बेन्सन अँड हेजेस, डनहिल व स्टेट एक्स्प्रेस असे आपले आवडीची सिगारेट ब्रँडही घेऊन येईल, म्हणून त्याचे वडील सँटन डिकोस्टा वाट बघत असतात. त्यांच्याकडील सिगारेट संपत आलेल्या असतात.

चॉकलेटप्रेमी व कॉलेजला जाणारा धाकटा भाऊ कैतानो डिकोस्टाला तोंडाला पाणी सुटेल, अशा टॉबलरवन व लिंड्ट चॉकलेटची प्रतीक्षा असते. तसेच, त्याची आई मारिया डिकोस्टा स्वादिष्ट फिश करी करण्यासाठी दरमहा लागणा-या मसाल्याची वाट बघत असते. प्रेडो परदेशातल्या वाळवंटात असलेल्या ऑईल रिगवरून परत येतोय असे वाटतच नाही, तर ते घराजवळच्या शॉपिंग मॉलमधून परत येतोय आणि भरपूर सवलती असलेल्या वस्तू खरेदी करून येतोय, असे वाटते.

अलीकडच्या काळात, बहुतेकसे प्रवासी विमानतळाकडे केवळ वाहतुकीची सुविधा म्हणून पाहत नाहीत, तर भरपूर सवलती देणा-या विविध डय़ुटी-फ्री खरेदीसाठी एक ठिकाण म्हणून पाहतात. प्रत्येक विमानतळ जास्तीत जास्त प्रवाशांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांचे एकमेकापासून असलेले वेगळेपण अधोरेखित करणारा एकमेव घटक म्हणजे दिली जाणारी सेवा व त्यामध्ये असलेले वैविध्य. त्यामध्ये अतिशय निश ब्रँडच्या सर्वात खास वस्तूंच्या खरेदीचा समावेश आहे.

साध्या सँडलपासून डिझाइनर कपडय़ांपर्यंत, लोकप्रिय चॉकलेटपासून च्युइंग गमपर्यंत आणि छान वास असलेल्या कॉफीच्या बियांपासून निरनिराळ्या प्रीमिअम ब्रँडच्या वाइन व लिकर, बेस्टसेलर पुस्तक व मासिकांपासून आकर्षक दागिन्यांपर्यंत-आज विमानतळावर सगळ्या वस्तू मिळतात. भरपूर खरेदी केल्यावर प्रवासी दमल्यास त्यांना जगभरतील खाद्यपदार्थ उपलब्ध असलेल्या विविध रेस्तराँमध्ये लज्जतदार पदार्थावर ताव मारून ताजेतवाने होता येते.

आघाडीचा आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल रिटेलर डय़ुफ्रीच्या मते, जागतिक डय़ुटी-फ्री उद्योगाची उलाढाल २०१६ मधील ४५.७ अब्ज डॉलरवरून २०२० सालापर्यंत ६७ अब्ज डॉलपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. २०२० पर्यंत विक्रीमध्ये २०१४च्या तुलनेत दुप्पट वाढ झालेली असेल. तसेच, येत्या पाच वर्षामध्ये विमानतळावरील रिटेल विक्रीच्या बाबतीत आशिया-पॅसिफिक ही झपाटय़ाने वाढणारी बाजारपेठ आहे. तसेच, सिक्युरिटी प्रक्रिया पूर्ण करत असताना अनेक प्रकारच्या प्रवाशांकडे भरपूर वेळ असतो. अशा प्रवाशांना हा वेळ उत्तम खरेदी करण्यासाठी व त्यांच्या जवळच्या व्यक्तींना भेट देण्यासाठी काही वस्तू घेण्यासाठी वापरता येऊ शकतो.

प्रवासादरम्यान खरेदीशी संबंधित गोष्टींसाठी वेळ मिळण्याची मोठी संधी विचारात घेता, मुंबई विमानतळ यावर मोठय़ा प्रमाणात भर देत आहे. आज, मुंबई विमानतळावर टी२ डिपार्चर येथे १६ डय़ुटी-फ्री दुकाने आहेत, टी१ डिपार्चर येथे २५ दुकाने आहेत, टी२ आंतरराष्ट्रीय डिपार्चर येथे ३३ दुकाने आहेत आणि टी२ डोमेस्टिक डिपार्चर येथे ४८ दुकाने आहेत. या दुकानांत व शोरूममध्ये जगभरातील जागतिक दर्जाची उत्पादने अतिशय सवलतीच्या दरात मिळतात.

शॉपिंग मॉलच्या तुलनेत विमानतळावरील रिटेलरना अनेक फायदे मिळतात. यातील एक फायदा म्हणजे, फिजिकल रिटेलमध्ये विक्रीसाठीच्या वेळा मर्यादित असतात, पण विमानतळावरील दुकान दिवस-रात्र सुरू असते. तसेच, वीकेंड व सुट्टय़ा या कालावधीत विमानतळावर कमालीची गर्दी असते.

येत्या काही वर्षामध्ये, विमानतळांमध्ये प्रचंड परिवर्तन होणार आहे व ते खरेदीसारख्या मूल्यवर्धित सेवांचा समावेश करून चोखंदळ प्रवाशांचे लक्ष वेधून घेणार आहेत व त्यामार्फत जास्तीचे उत्पन्न मिळवणार आहेत व ग्राहकांना अधिकाधिक पर्याय उपलब्ध करणार आहेत. प्रेडो डिकोस्टासारख्या प्रवाशांना खरेदीचे असंख्य पर्याय दिले जातील व हे चित्र भविष्यात आणखी उजळत जाईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version