Home Uncategorized विमा पॉलिसी आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात

विमा पॉलिसी आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात

0

शेअर बाजारात ‘डिपॉझिटरी’ यंत्रणा यशस्वी कार्यान्वित झाल्यानंतर आता विमा क्षेत्रात याचे आगमन होणार आहे. 

संग्रहित छायाचित्र

हैदराबाद- शेअर बाजारात ‘डिपॉझिटरी’ यंत्रणा यशस्वी कार्यान्वित झाल्यानंतर आता विमा क्षेत्रात याचे आगमन होणार आहे. यामुळे विमा पॉलिसींची महत्त्वाची कागदपत्रे आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) जगातील पहिलीच विमा रिपॉझिटरी तयार केली आहे. याचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते १६ सप्टेंबर रोजी होणार आहे.

विमा काढल्यानंतर विमा कंपन्याकडून विमाधारकाला पॉलिसीचा बॉँड पाठवला जातो. या सर्व पॉलिसी २० ते ५० वर्षापर्यंत असतात. पॉलिसीचे बॉँड खराब झाल्यानंतर विमाधारकांना आर्थिक भरुदड पडतो. तसेच हा बॉँड हरवल्यास विमाधारकाचे निधन झाल्यास मोठा मनस्ताप होतो. त्यामुळे सर्व कागदी विमा पॉलिसींचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरण करण्याचा निर्णय आयआरडीएने घेतला.

रिपॉझिटरीचे कामकाज पाहण्यासाठी एनएसडीएल डाटाबेस मॅनेजमेंट लिमिटेड, सेंट्रल इन्शुरन्स रिपॉझिटरी लिमिटेड, एसएचसीआयएल प्रोजेक्ट लिमिटेड, सीएएमएस रिपॉझिटरी सव्‍‌र्हिसेस लिमिटेड आणि कार्वी इन्शुरन्स रिपॉझिटरी लिमिटेड आदींची निवड झाली आहे. या रिपॉझिटरीतर्फे विमा धारकांना एक युनिक कोड नंबर दिला जाणार आहे. या नंबरच्या सहाय्याने सर्व व्यवहार केले जाणार आहेत. क्लेम्स, नॉमिनी व अन्य माहितीचा तपशील यात असणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version