Home क्रीडा विश्वचषकानंतर मिसबा एकदिवसीय संघातून निवृत्त होणार

विश्वचषकानंतर मिसबा एकदिवसीय संघातून निवृत्त होणार

0

एकदिवसीय विश्वचषकानंतर पाकिस्तानचा कर्णधार मिसबा-उल-हक एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. मात्र तो कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे.

कराची – एकदिवसीय विश्वचषकानंतर पाकिस्तानचा कर्णधार मिसबा-उल-हक एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. मात्र तो कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे.

‘‘एकदिवसीय आणि टी-२०मधून विश्वचषकानंतर निवृत्त होणार असल्याचे मी सात दिवसांपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) कळवले आहे. मात्र कसोटी क्रिकेट मी खेळत राहणार आहे. गेले अनेक दिवस मी त्याचा विचार करत आहेत. अर्थातच विश्वचषकात खेळून मला निवृत्त व्हायला आवडेल,’’ असे मिसबाने म्हटले.

एप्रिल २००२मध्ये पदार्पण केल्यापासून ४० वर्षीय मिसबाने १५३ वनडे खेळल्या आहेत. त्यात त्याने ४६६९ धावा फटकवल्या आहेत. त्यात ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांतील धावा असताना एकही शतक नाही या विक्रमाची त्याच्या नावावर नोंद आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version